Fashion : लग्न असो की साखरपुडा.. किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो, साडी म्हटलं की महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असतो.. विविध समारंभ, कार्यक्रम, अनेक प्रसंगी महिलांसाठी साडी हा एक उत्तम पर्याय आहे. जेव्हा तुम्ही साडी नेसता, तेव्हा त्यात तुमचा लूकही स्टायलिश दिसायला हवा यासाठी महिला अभिनेत्रींना फॉलो करतात. तुम्हालाही जर अभिनेत्रींप्रमाणे साडीत स्टायलिश दिसायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रीच्या काही साडी डिझाईन्स दाखवत आहोत, ज्या नेसल्यानंतर तुम्ही सुद्धा अभिनेत्रीप्रमाणे दिसाल, आणि सर्वांकडून कौतुक होईल..
नेट साडी
इथे दाखविल्याप्रमाणे अशा प्रकारची नेट साडी तुम्ही अनेक कार्यक्रमासाठी नेसू शकता. ही साडी कशी स्टाईल करायची यासाठी, तुम्ही अभिनेत्री पलक तिवारीच्या लूकवरून कल्पना घेऊ शकता. तुम्ही ही साडी बाजारातून विकत घेऊ शकता आणि शिंप्याकडून अशा प्रकारचे ब्लाउज शिवून घेऊ शकता. ही साडी तुम्हाला जवळपास 2000 रुपयांना बाजारात सहज मिळू शकते.
मिरर वर्क साडी
मिरर वर्कची ही साडी तुम्ही अनेक फंक्शन्समध्ये नेसू शकता, ही साडी कशी नेसायची? यासाठी तुम्ही अभिनेत्री दिव्या खोसला हिच्या लूकवरून कल्पना घेऊ शकता. तुम्ही ही साडी बाजारातून विकत घेऊ शकता आणि या साडीसोबत अभिनेत्रीने परिधान केलेल्या बॅकलेस ब्लाउजसह तिच्या बॉर्डरवर मिरर वर्क करून घेऊ शकता आणि तुम्ही ती एखाद्या डिझायनरच्या मदतीने बनवू शकता. तुम्हाला अशाच प्रकारच्या साड्या बाजारात 1000 ते 2000 रुपयांना सहज मिळतील.
सी थ्रू साडी
साधा लुक हवा असेल तर तुम्ही या प्रकारची साडी घालू शकता. या प्रकारच्या साडीसाठी, तुम्ही अभिनेत्री राधिका मदनच्या लूकवरून कल्पना घेऊ शकता, तर या प्रकारच्या साडीसोबत तुम्ही हॉल्टर नेक ब्लाउज घालू शकता. तुम्ही या प्रकारची साडी बाजारातून खरेदी करू शकता आणि तुम्हाला ती 1500 ते 2000 रुपयांपर्यंतच्या किमतीत ऑनलाइन देखील मिळेल.
हेही वाचा>>>
Fashion : पावसाळ्यात मेकअप जाण्याचं टेन्शन! Don't Worry, 'असा' करा वॉटरप्रूफ मेकअप की, चेहरा दिसेल ताजातवाना
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )