Health Tips : सॅलड खाल्ल्याने वजन तर नियंत्रणात राहतेच, पण उन्हाळ्यात पोटाच्या समस्याही दूर होतात. ग्रीन सॅलड खाल्ल्याने तुमचे आरोग्य तर चांगले राहतेच, शिवाय तुमची त्वचा आणि केसही निरोगी राहतात. ग्रीन सॅलड कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्याचे काम करते. बहुतेक लोकांना लंच किंवा डिनरसोबत सॅलड खायला आवडते. ग्रीन सॅलड हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. टोमॅटो, कांदा, कोबी, ब्रोकोली, ओवा, काकडी, झुकीनी अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश ग्रीन सॅलडमध्ये केला जातो.


या सर्व पदार्थांमध्ये कॅलरी खूप कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे. कॅलरीज कमी असल्याने शरीराचे वजन वाढत नाही. आहारात या सॅलडचा समावेश करून लठ्ठपणा सहज कमी करता येतो. तसेच, उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवता येते. चला तर, जाणून ग्रीन सॅलड खाण्याचे फायदे...


वजन नियंत्रण : वाढते वजन किंवा लठ्ठपणामुळे हैराण असाल, तर उन्हाळ्यात आहारात ग्रीन सॅलडचा अवश्य समावेश करा. ग्रीन सॅलडमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.


पचन सुधारते : उन्हाळ्यात ग्रीन सॅलड खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्या कमी होतात. ग्रीन सॅलडमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे शरीर निरोगी राहते आणि पचन सुधारते.


कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते : शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात ग्रीन सॅलडचा समावेश जरूर करावा. ग्रीन सॅलडमध्ये आढळणारे पोषक तत्व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्यास हृदय निरोगी राहू शकते.


बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या दूर करते : उन्हाळ्यात बहुतेक लोकांना बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांशी सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत ग्रीन सॅलड खाल्ल्यास या समस्यांपासून सुटका मिळू शकते. ग्रीन सॅलड खाल्ल्याने शरीर निरोगी राहते आणि पोटाच्या समस्या दूर होतात.


त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर : ग्रीन सॅलड खाणे आरोग्यासाठी तर चांगले असतेच, पण यामुळे त्वचा आणि केसही निरोगी राहतात. ग्रीन सॅलड खाल्ल्याने त्वचा चमकदार होते आणि केसांची वाढ सुधारते. ग्रीन सॅलडमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट घटक फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :