Mosquitoes Repellent : घरात डास असतील, तर झोप तर खराब होतेच, पण अनेक आजारांचा धोकाही वाढतो. उन्हाळ्याच्या-पावसाळ्याच्या काळात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते. अशा परिस्थितीत लोक डासांपासून दूर राहण्यासाठी विविध उपाय करू लागतात. डास चावल्याने डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार होतात. आजकाल कॉइल आणि इतर मॉस्किटो रिपेलेंट लिक्विड रिफिलदेखील डासांच्या या त्रासावर काम करत नाहीत. या पद्धतींमुळे काही काळ आराम मिळतो, त्यांचा प्रभाव कमी होताच डास चावायला लागतात.


अशा परिस्थितीत, डासांना दूर करण्यासाठी तुम्ही प्रभावी घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. डासांना दूर करण्यासाठी अशा अनेक नैसर्गिक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला शांत झोप देऊ शकतात. जाणून घ्या डासांपासून सुटका मिळवण्यासाठीचे नैसर्गिक उपाय...


निलगिरी तेल : जर तुम्हाला दिवसाही डास चावत असतील, तर तुम्ही निलगिरीचे तेल वापरू शकता. यासाठी, निलगिरी तेलात लिंबू समान प्रमाणात मिसळा. आता हे तेल अंगाला लावा. याच्या तिखट वासामुळे डास तुमच्या आजूबाजूला फिरकणार नाहीत.


लसूण : घरात डास येऊ नयेत यासाठी लसूण वापरा. लसणाच्या वासाने डास पळून जातात. यासाठी लसूण बारीक करून पाण्यात टाकून उकळवा. आता हे पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा. त्यामुळे बाहेरून डास घरात येणार नाहीत.


कापूर : जर तुम्हाला रात्रीच्या वेळी डास त्रास देत असतील आणि तुम्हाला कॉइल किंवा इतर रासायनिक गोष्टींचा वापर करायचा नसेल, तर तुम्ही कापूर वापरू शकता. घरात कापूर जाळून टाका आणि सुमारे 15-20 मिनिटे तसाच राहू द्या. यामुळे डास लगेच पळून जातील.


लॅव्हेंडर : डासांना घालवण्यासाठी लॅव्हेंडर हा आणखी एक घरगुती उपाय आहे. त्याचा सुगंध खूप डार्क आहे. यामुळे डास आजूबाजूला येत नाहीत. यासाठी तुम्ही घरी लॅव्हेंडर रूम फ्रेशनर देखील लावू शकता.


कडुलिंबाचे तेल : कडुलिंबाचे तेल डासांना घालवण्यासाठी वापरले जाते. यासाठी कडुलिंब आणि खोबरेल तेल समप्रमाणात मिसळा. आता हे तेल अंगावर चांगले लावा. यामुळे सुमारे आठ तास डास तुमच्या जवळ फिरकणार देखील नाहीत.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha