Health Tips During Festive Season : दिवाळी या सणाची वाट लोक उत्सुकतेने पाहतात. अनेकांनी दिवाळीच्या तयारीला सुरूवात देखील केली आहे. कोरोना काळात सण आणि उत्सव साजरे करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या कुटुंबासोबत दिवाळीमधील भाऊबीज (Bhaubeej) , लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशी (Dhanteras) हे सण साजरे करत असताना विशेष काळजी घ्यावी.  


सणांमध्ये अनेकांच्या घरी फराळ तयार केले जातात. तसेच सणांमध्ये तेलकट आणि तिखट पदार्थ जास्त खाल्ले जातात. त्यामुळे तुम्हाला सणांमध्ये तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. फराळाचे पदार्थ सारखे खाण्याने तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे पदार्थ कमी प्रमाणात खाऊन पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा. 
 
या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष 
कुठेही बाहेर जाताना मास्कचा वापर करावा. तसेच  सोशल डिस्टिंनसिंग ठेवा. हात नियमितपणे धुवा आणि सॅनिटायझरचा वापर करा.  सणांमध्ये खरेदीसाठी लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करत असतात. त्यामुळे जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे टाळा. दिवाळीला फटाके उडवायला अनेकांना आवडातात. पण त्यामुळे प्रदुषण होते. तसेच श्वासाचे वेगवेगळे त्रास होऊ शकतात. त्यामुळे फटाके उडवू नका. 


Skin Care Tips : त्वचेचं तारुण्य टिकवायचंय? 'हे' घरगुती उपाय करतील मदत


गिफ्ट ऑनलाइन पाठवा 
कोराना काळात मित्र मैत्रिणी किंवा कुटुंबातील व्यक्तिंना गिफ्ट द्यायचे असेल तर ते ऑनलाइन पद्धतीने पाठवा. प्रवास करणे किंवा प्रत्येक्षात भेटणे टाळा. पुस्तके जुन्या फोटोंचे कोलाज,  फोटो फ्रेम, चॉकलेट्स आणि  इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी भेटवस्तू तुम्ही देऊ शकता. 


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित


 ...म्हणून दिवाळीला दिवे लावण्याची प्रथा


दिवाळीला प्रकाशाचा आणि दिव्यांचा उत्सव मानले जाते. या सणांमध्ये घराबाहेर दिवे लावून आकर्षक रोषणाई केली जाते.दिवाळीला घराबाहेर दिवे लावण्यामागे कास कारण आहे. रामाने कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला रावणाचा वध केला आणि ते अयोध्येला पुन्हा परतले. राम यांच्या अयोध्येला येण्याच्या आनंदात  अयोध्यामधील लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते. त्यामुळे दिवाळीला दिवे लावले जातात.


Bhaubeej 2021Gift Ideas : भाऊबीजेला बहिणीला द्या 'ही' खास भेट


Weight Loss Without Exercise : व्ययाम न करता झटपट कमी होईल वजन; ट्राय करा 'ही' सोपी ट्रिक