महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची आजच चौकशी होण्याची शक्यता,  एनसीबीचं दक्षता पथक आज मुंबईत येणार, वानखेडे दिल्लीत दाखल.. 


क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले होते. पण या प्रकरणातला पंच प्रभाकर साईल यानं लाचखोरीचे आरोप केल्यानं समीर वानखेडेच चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. एनसीबीनं वानखेडेंची खात्याअंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एनसीबीचं दक्षता पथक आजच मुंबईत दाखल होणार आहे आणि आजपासूनच चौकशी सुरु होणार आहे.


2. प्रभाकर साईल यांच्या आरोपानंतर किरण गोसावी शरण येण्यासाठी लखनऊ पोलिसांकडे, लखनऊ पोलिसांचा गोसावीला ताब्यात घेण्यास नकार, पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊकडे रवाना


3. मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, सुटका होणार का? याकडे लक्ष


आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. गेल्या 18 दिवसांपासून आर्यन खान अटकेत आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात मंगळवारी (आज) सुनावणी पार पडणार आहे. 


4. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात प्रथमच दैनंदिन बाधितांची संख्या हजाराच्या खाली, दिवसभरात 889 नवे रुग्ण, मृत्यूच्या संख्येतही घट


5. एसटीच्या तिकीट दरात 17 टक्क्यांची भाडेवाढ,  मध्यरात्रीपासून नवे दर लागू तर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्क्यांनी वाढ


पाहा व्हिडीओ :



 


6. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात तपासयंत्रणेकडे सबळ पुरावे, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती


7.  28 तारखेपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 100 टक्के क्षमतेनं लोकल फेऱ्या चालवणार, प्रवासी वाढल्याने रेल्वे प्रशासनाचा निर्णय 


8. मुंबईत गार्डनमध्ये खेळत असताना खड्ड्यात पडून 2 मुलांचा मृत्यू, ॲंटॉप हिलमधील घटना, कठडे नसल्यानं जीव गमावावा लागला


9. मी आणि समीर जन्मानं हिंदूच, कधीही धर्म बदलला नाही, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील नवाब मलिकांच्या आरोपांना अभिनेत्री क्रांती रेडकरचं प्रत्त्युत्तर 


क्रांती रेडकरने नबाव मलिक यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. क्रांती ट्वीट करत म्हणाली, मी आणि समीर जन्मानं हिंदूच, कधीही धर्म बदलला नाही." एकीकडे क्रांती रेडकरच्या फोटोंवर चाहते सत्यमेव जयते अशा प्रकरच्या कमेंट्स करत तिला सकारात्मक उर्जा देत आहेत. तर अनेकांनी तिच्यावर निशाणादेखील साधला आहे. हिंदू दामपत्याचा मुलगा मुस्लिम कशा अशा चर्चादेखील सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.


10. आयपीएलच्या रणांगणात लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम्स.. आरपीजी आणि सीव्हीसी कॅपिटल्स या दोन उद्योग समूहांची यशस्वी बोली