Health Tips : खजूर हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात. खजूर हे एक स्वादिष्ट ड्रायफ्रूट असून यामध्ये गोडपणा आणि पोषक तत्व असतात. खजूरमध्ये कोरडे खजूर आणि ताजे खजूर असे दोन प्रकार आहेत. आज आपण या दोघांमध्ये नेमका कोणता फरक आहे हे जाणून घेणार आहोत.  


खजूर काय आहेत?


खजूर ही स्वादिष्ट छोटी फळे आहेत जी अत्यंत गोड असतात. जगभरात खजूरांच्या अनेक जाती आहेत. वेगवेगळ्या देशात खजूर वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात. खजूर अशा फळांपैकी एक आहे ज्यांचा जवळजवळ प्रत्येक संस्कृतीच्या आहारात समावेश केला जातो. अनेक देशांत खजूर ड्रायफ्रूट म्हणून वापरले जाते. तर, काही ठिकाणी यापासून गोड पदार्थ बनवले जातात. 


कोरडे खजूर


सर्वात आधी, खजूर हे झाडापासून कच्चे उपटले जातात आणि उन्हात वाळवले जाते. हे खजूर आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत काही दिवस किंवा आठवड्यांआधी त्यांची कापणी केली जाते.


ताजे खजूर


खजूर पूर्णपणे पिकल्यावर त्यांचा रंग बदलतो. त्याची चवही बदलू लागली तर त्याला रुताब खजूर म्हणतात. पिकलेल्या खजूर तपकिरी रंगाच्या होतात. या खजुरांमध्ये ओलावा  फक्त 50-70% च्या दरम्यान असतो. जसजसे ते पिकतात तसतसे ते मऊ आणि अत्यंत रसदार बनतात. याबरोबरच पिकलेल्या खजुराचा गोडवाही खूप वाढतो. हे खजूर खूप लवकर खराब होतात पण जर त्या गोठवून ठेवल्या तर 2 वर्ष टिकतात. तुम्हाला हे पिकलेले खजूर देशाच्या आणि जगाच्या कोणत्याही भागात सापडतील.


दोघांपैकी कोणते चांगले आहे?


दोन्ही प्रकारच्या खजूर आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहेत. तुम्ही ते रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी आरामात खाऊ शकता. तुम्ही ते दूध किंवा फळांसोबत आरामात खाऊ शकता. ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.


खजूर आणखी चवदार कसा बनवाल?


खजुरातील बी काढून त्यात अक्रोड किंवा आणखी कोणताही सुका मेवा भरल्यास त्याची चव आणखी छान लागते.


खजुराचे तुकडे साखरेचा पर्याय म्हणून सलाडमध्ये वापरता येऊ शकतात.


दूध, दही, कस्टर्डबरोबरही खजुराची चव चांगली लागते. पण, या साख्या पदार्थांमध्ये खजूर असल्याच रिफाइन्ड साखरेचा वापर टाळावा.


मिठाई किंवा गोडाचा एखादा पदार्थ खाण्याची इच्छा असल्यास डाएटला केंद्रस्थानी ठेवता अशा पदार्थांऐवजी खजूर खाणं कधीही उत्तम.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा