Health Tips : पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पावसाळ्यात (Monsoon Season) आरोग्यासह त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अनेकांना पावसाळा खूप आवडतो. पण या ऋतूमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच या ऋतूत त्वचेची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
पावसाळ्यात (Monsoon) तेलकट तसेच मसालेदार पदार्थ देखील खाण्याची खूप इच्छा होते. मात्र, तेलकट पदार्थांमुळे आपल्या त्वचेवर पावसाळ्यात मुरूम, फोड आणि पिंपल्सची समस्याही वाढते. अशा परिस्थितीत त्वचेची जर नीट काळजी घेतली नाही तर ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही पावसाळ्यात तुमच्या चेहऱ्याची चमक कायम ठेवू शकता.
कोरफडचा वापर करा
कोरफड (Aloe Vera) ही अशी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे ज्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. तुम्ही प्रत्येक ऋतूमध्ये कोरफडीचा वापर चेहऱ्यासाठी करू शकता. कोरफड चेहऱ्या व्यतिरिक्त त्वचा, केस आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्याने मुरुमांपासून सुटका मिळते. तसेच अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्माने समृद्ध कोरफड वापरल्याने त्वचेवर ग्लो कायम राहतो.
बटाट्याचा रस त्वचेसाठी फायदेशीर
बटाट्याचा रस तजेलदार आणि सुंदर त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो. पावसाळ्यात बटाट्याचा रस लावावा. कारण यामुळे अनेक समस्या दूर होतात. बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावण्यासाठी सर्वात आधी बटाटा किसून घ्या आणि नंतर त्याचा रस गाळून घ्या. यानंतर बटाट्याचा रस मुलतानी मातीमध्ये मिसळून 20 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही जर आठवड्यातून तीन वेळा हा उपाय केला तर तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवेल.
चंदन पावडर
पावसाळ्यात चेहऱ्यावर चंदन पावडर लावणे फायदेशीर मानले जाते. तुम्ही चंदनाचा पॅक बनवून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे त्वचा चांगली राहते. तसेच चंदन पावडरचा वापर केल्याने टॅनिंग दूर होते आणि सुरकुत्याही कमी होतात.
तर, या पावसाळ्यात तुम्हालाही तुमची स्किन तजेलदार आणि सुंदर हवी असेल तर हे घरगुती तसेच नैसर्गिक उपाय करून पाहा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा