Diwali 2024: दिवाळी सण आला की सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. अशात मिठाई, फराळ, सुका मेवा अशा विविध पदार्थांची रेलचेल असते. खास दिवाळीनिमित्त मिठाई बनवण्यासाठी आणि भेटवस्तू म्हणून बदाम, काजू, अक्रोड, मनुका, पिस्ता, अंजीर अशा सुक्या मेव्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र सणासुदीचा काळ जवळ आल्याने बाजारात बिनधास्तपणे बनावट सुका मेवा विकला जात आहे. खोटा सुका मेवा ओळखायचा असेल तक 5 प्रकारांनी ओळखू शकता... जाणून घ्या..


ॲलर्जी, श्वासोच्छवासाचा त्रास, पोटाचा त्रास, अगदी कॅन्सरचा धोकाही


दिवाळीच्या काळात हे बनावट काजू आणि बदाम गिफ्ट बॉक्सच्या कप्प्यांमध्ये भरले जात आहेत. हे खाल्ल्याने ॲलर्जी, श्वासोच्छवासाचा त्रास, पोटाचा त्रास आणि अगदी कॅन्सरचा धोकाही वाढतो. हे ड्रायफ्रूट्स धोकादायक रसायने आणि विविध हानिकारक रंगांनी लेपित आहेत. बदाम आणि काजूची चमक वाढवण्यासाठी अशा प्रकारे काम जाते. रसायने आणि कृत्रिम रंग आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असून डीएनए आणि हार्मोन्समध्ये अडथळा आणू शकतात. जाणून घेऊया नकली ड्रायफ्रुट्स कसे ओळखायचे?


बनावट किंवा खराब झालेले ड्रायफ्रुट्स ओळखण्याचे 5 मार्ग



  • रंगात फरक

  • खायला खूप कठीण

  • सुक्या मेव्याचा विचित्र वास

  • चोळल्यावर रंग सोडतात

  • पाण्यात भिजल्यावर रंग कमी होतो


बनावट बदाम आणि काजू कसे ओळखावे?



  • बदाम आणि काजू कृत्रिम रंगांनी लेपित असेल तर....

  • जर बदामाच्या दाण्यांचा रंग वेगळा असेल किंवा काही फिकट असतील

  • काही गडद असतील तर ते बनावट असू शकतात.

  • तसेच, नकली बदाम कुस्करल्यावर त्यांचा रंग गमावतो.

  • त्याचप्रमाणे बनावट काजूचा रंग पिवळा असतो.

  • भेसळ केलेल्या काजूलाही तेलासारखा वास येऊ शकतो.


बनावट मनुका आणि अक्रोड कसे शोधायचे?



  • बनावट मनुक्याच्या रंगातही फरक असतो.

  • तसेच, त्यात ओलेपणा असू शकतो आणि वास घेताना एक विचित्र वास येऊ शकतो.

  • भेसळयुक्त मनुका चोळल्यावर रंग सोडू शकतो.

  • बनावट अक्रोडाचा रंग गडद तपकिरी असू शकतो.

  • आतून तेलाचा वास येऊ शकतो.


बनावट अंजीर आणि पिस्ते कसे ओळखावे?



  • तुम्ही नकली पिस्ते आणि अंजीर खाल्ल्याने ओळखू शकता.

  • भेसळ केल्यावर ते खाण्यास कठीण होतात आणि त्यावर एक वेगळीच चमक असते

  • तसेच, त्यांना कडू चव आणि वास येऊ शकतो. 


 


हेही वाचा>>>


Diwali 2024: दिवाळीच्या फोटोंमध्ये दिसाल स्लिम-ट्रीम! फक्त पोज देताना 'या' ट्रिक्स फॉलो करा अन् कमाल बघा, लाईक्सवर लाईक्स येतील


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )