Diwali Photo Idea: उठा...उठा दिवाळी आली.. फोटो काढायची वेळ झाली..! दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. अशात संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. सण असो..लग्न असो.. किंवा कोणताही प्रसंग.. सणासुदीच्या काळात प्रत्येकजण फोटोंच्या माध्यमातून त्या आठवणी टिपण्याचा प्रयत्न करतो. पण अशावेळी काही स्त्रिया फोटो काढण्यास टाळाटाळ करतात, कारण फोटोंमध्ये त्यांचे शरीर जाड दिसते. तर या ट्रिक्स ट्राय करून पाहा. म्हणजे तुमचे फोटो सुंदर येतील, आणि लाईक्सही मिळतील...
फोटोमध्ये शरीर लठ्ठ दिसणार नाही, फक्त इतकंच करा
फोटोंमध्ये स्लिम आणि सुंदर दिसावे असे कोणाला वाटत नाही, पण प्रत्येकजण इतका फोटोजेनिक असेलच असे नाही. अनेकदा काही लोक या कारणास्तव त्यांचे फोटो काढण्यासही लाजतात. फोटो क्लिक करण्यासाठी कोणत्याही विशेष प्रसंगाची गरज नाही. पण काही महिला अनेकदा फोटो काढण्याचे टाळतात. एव्हरेज बॉडी असूनही त्या फोटोत लठ्ठ दिसतात, असे त्यांना वाटते. त्यामुळे काही जण फोटो काढण्यापासून दूर पळतात. पोज देताना तुम्ही या छोट्या ट्रिक्स फॉलो केल्यास तुमचे शरीर कोणत्याही फोटोमध्ये फॅट दिसणार नाही. तसं पाहायला गेलं तर सडपातळ दिसण्यासाठी डाएट आणि वर्कआऊटपेक्षा चांगला मार्ग दुसरा नाही, पण जर तुम्हाला तुमच्या फोटोमध्ये स्लिम दिसायचे असेल, तर खाली दिलेल्या या उपायांचे अवश्य पालन करा.
45 डिग्री एंगलने फोटो काढा
फोटो काढताना, बहुतेक लोक सरळ उभे राहतात आणि थेट कॅमेराकडे पाहतात. असे केल्याने तुमचे शरीर अधिक मोठे दिसू शकते. त्याऐवजी, आपले खांदे सरळ करा आणि त्यांना थोडेसे तिरपे करा. म्हणजे कॅमेऱ्यातून 45 अंशाच्या कोनात वळा आणि पोझ द्या
शरीराच्या जवळ हात आणू नका
पोज देताना हात शरीराच्या अगदी जवळ आणू नका. असे केल्याने हात धष्टपुष्ट दिसतात आणि शरीरही भारदस्त दिसू लागते. त्याऐवजी, शरीरापासून दूर हाताने पोझ द्या. उदाहरणार्थ, कंबरेजवळ किंवा केसांवर, हवेत किंवा कशावर तरी हात ठेवा.
पायऱ्यांवर बसून पोज
याशिवाय, काही पोझ अशा आहेत, ज्यामुळे तुमचा फोटो परिपूर्ण दिसतो. जसे की पाय लांब करून पोझ देणे किंवा पायऱ्यांवर बसून पोझ देणे. असे केल्याने हातावरील फॅट्स दिसणार नाही आणि फोटोही परफेक्ट दिसेल. असे केल्याने फोटो अधिक परफेक्ट दिसतो.
कॅमेरा पोझिशन
स्लिम दिसण्यासाठी फोटो काढताना लो अँगल पोज घेतल्यास नक्कीच थोडे स्लिम दिसाल. या कोनात, तुम्ही वरच्या दिशेने पाहता, ज्यामुळे तुमची मान लांब होईल आणि तुम्ही सडपातळ दिसाल. जेव्हाही तुम्ही फोटोसाठी पोज द्याल तेव्हा तुमचे डोके थोडे पुढे करा आणि फोटो क्लिक करा.
कसा काढाल फोटो?
जेव्हाही तुम्ही कॅमेऱ्यासमोर पोझ द्याल तेव्हा तुमचे हात शरीराजवळ सरळ ठेवण्याऐवजी कंबरेवर ठेवा. यामुळे तुमचे शरीर जड दिसणार नाही. जर तुम्ही बसून पोज देत असाल तर सरळ बसण्याऐवजी नेहमी पाय क्रॉस करून बसा आणि मांड्यांवर हात ठेवा. या पोजमध्ये तुम्ही सर्वात स्लिम दिसाल. फोटोमध्ये जास्त हेल्दी दिसू नये म्हणून समोरच्या पोझऐवजी साइड पोजमध्ये फोटो काढणे चांगले आहे. या अॅंगलने तुमचे शरीर नक्कीच थोडे स्लिम दिसेल.
कपड्यांची निवड
साधारणपणे, जर तुम्ही गडद रंगाचा ड्रेस घातला असेल तर तुमचा फोटो त्यात स्लिम दिसतो. विशेषत: काळा किंवा नेव्ही ब्लू सारखे रंग हे अतिशय सुरक्षित पर्याय आहेत, जे प्रत्येकाला चांगले दिसतात आणि शरीर देखील सडपातळ दर्शवितात. त्यामुळे फोटो काढताना फक्त डार्क शेडचाच चांगला पोशाख घाला.
हेही वाचा>>>
Winter Travel: नोव्हेंबरच्या गुलाबी थंडीत प्री-वेडिंग शूटिंग करायचंय? महाराष्ट्रातील 'हे' हिल्स स्टेशन, कमी बजेटमध्ये फोटो येतील सुंदर
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )