एक्स्प्लोर

Diwali 2021 : आज वसुबारस... म्हणजेच, गोवत्स द्वादशी! जाणून घ्या महत्त्व?

Diwali 2021 : आज दिवाळीचा पहिला दिवा... वसुबारस. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.

Diwali 2021 : कोरोना संकटात संपूर्ण देशभरात दिवाळी आनंदानं पण साधेपणाने साजरी केली जाणार आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून प्रशासनाकडूनही अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी होणार आहे. सगळीकडे दिवाळीची तयारी सुरु आहे. अशातच आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. आज गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे, गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच, द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.

भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. आश्‍विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.

वसुबारस व्रत :

या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीतही केला जातो. पण तंस पाहायला गेलं तर, तो सण वेगळा असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासूनच दिवाळीला सुरुवात होते, हा दिवाळीचा पहिला दिवा असतो, असं मानलं जातं. यंदा सोमवार, म्हणजेच, 01 नोव्हेंबर 2021 रोजी निज अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसुबारस आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

यंदाच्या दिवाळीचे महत्त्वाचे दिवस :

  • वसुबारस : निज अश्विन कृष्ण द्वादशी - 1 नोव्हेंबर, 2021
  • धनत्रयोदशी : निज अश्विन कृष्ण त्रयोदशी - 2 नोव्हेंबर, 2021
  • नरक चतुर्दशी : लक्ष्मीपूजन : निज अश्विन अमावास्या - 4 नोव्हेंबर, 2021
  • बलिप्रतिपदा/पाडवा : कार्तिक शुद्ध प्रतिपदा - 5 नोव्हेंबर 2021
  • भाऊबीज : कार्तिक शुद्ध द्वितीया - 6 नोव्हेंबर 2021

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Embed widget