एक्स्प्लोर
VIDEO: एका बिल्डिंगवरुन दुसऱ्या बिल्डिंगवर, अंगावर शहारे आणणारा सायकल स्टंट!
मुंबई: काळजाचा ठोका चुकवणारे अनेक स्टटं आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. सायकलिंग करणारा तरुण आणि त्याचे एक-एक स्टंट पाहून आपल्यालाही धक्का बसतो.
अवघ्या दोन महिन्यापूर्वी सायकलिंग स्टंटचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओत स्टंटबाज एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर सायकल घेऊन लिलया स्टंट करतो. अनेक अडथळे पार करत संपूर्ण मानवी वस्ती केलेले हे स्टंट खरंच पाहण्याजोगे आहेत. असे स्टंट शिकण्यासाठी त्यानं कठोर मेहनत केली आहे.
दोन महिन्यापूर्वी अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ फेसबुकवर तब्बल 62 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर दीड लाखांपेक्षा अधिक जणांनी तो शेअर केला आहे.
(या व्हिडिओमध्ये अत्यंत खतरनाक स्टंट करण्यात आले आहेत. पण यासाठी स्टटंबाज तरुणानं खास प्रशिक्षण घेतलं आहे. त्यामुळे असे स्टंट करण्याचा तुम्ही प्रयत्न करु नका)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement