HDFC Share Price : देशातील सर्वात मोठी हाउसिंग कंपनी HDFC आणि सर्वात मोठी खासगी बँक HDFC Bankच्या  शेअरमध्ये आज मोठी उसळण दिसून आली. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणासाठी संचालक मंडळांनी मंजुरी दिली. या वृत्तानंतर दोन्ही कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. 

Continues below advertisement


दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळांनी बैठकीतील ठरावाच्या निर्णयाची माहिती शेअर बाजाराला दिली. त्यानंतर आज दोन्ही कंपन्यांचे शेअर दर मोठ्या प्रमाणावर वधारले. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एचडीएफसीचा शेअर 13.60 टक्क्यांनी वधारला. तर, एचडीएफसी बँकेचा शेअरदेखील 10 टक्क्यांनी वधारला होता. 


विलीनीकरणानंतर असा असणार शेअर होल्डिंग पॅटर्न 


कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकोर्ड डेटनुसार, HDFC Limited च्या शेअरधारकांना 2 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या 25 शेअर ऐवजी एचडीएफसी बँकेचे 42 शेअर मिळतील. ज्याचे दर्शनी मूल्य एक रुपये असेल. विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेत एचडीएफसी लिमिटेडचे 41 टक्के भागिदारी असणार आहे. विलीनीकरणाची प्रक्रिया ही आर्थिक वर्ष 2024 मधील दुसऱ्या अथवा तिमाहीत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणासाठी अद्यापही विविध नियमकांची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. या दोन्ही कंपन्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी, CCI, IRDAI, PFRDA, NCLT, BSE, NSE, National Housing Bank आदींची मंजुरी घ्यावी लागणार आहे. 


शेअर बाजारात उसळण


शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसूत असून सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. शेअर बाजार सुरू होताच काही सेन्सेक्सने 59900 अंकाचा टप्पा ओलांडला होता. तर, निफ्टी 17900 अंकापर्यंत आला होता. जागतिक बाजारपेठांमध्ये पुन्हा तेजी आल्यानं आठवड्याची चांगली सुरुवात झाली आहे. आशियाई बाजारपेठांमधील निर्देशांकही वधारला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: