Vitamins For Covid 19 : कोरोनापासून बचाव करायचा असेल तर आपल्याला आपली शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करावी लागेल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपल्याला योग्य ती खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे. शरीर स्वास्थ ठेवायचं असेल तर आपल्या शरीराला व्हिटॅमिनची खूप गरज असते.  व्हिटॅमिन बी, सी आणि डी यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. 


व्हिटॅमिन आणि मिनरल्समुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांना दूर ठेवता येते. व्हिटॅमिन हे आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवते. त्यासाठीच कोणते व्हिटॅमिन हे शरीराला गरजेचे आहे आणि कोणत्या पदार्थात कोणते व्हिटॅमिन असते हे आपण पाहू.    


व्हिटॅमिन सी  (Vitamin-C ):


व्हिटॅमिन सी जीनवसत्त्वाच्या कमतरतेमुळे फुफ्फुसाला सूज येते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. आपण व्हिटॅमिन सी च्या पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन न केल्यास त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यासाठी आहारात आंबट पदार्थांचा आणि भाज्यांचा समतोल राखणे फार महत्वाचे. यात व्हिटॅमिन सी चे प्रमाण योग्य प्रमाणात असल्याने फुफ्फुसाची सूज कमी करते. 


व्हिटॅमिन बी  (Vitamin-B 6) :


व्हिटॅमिन बी या जीनवसत्त्वामध्ये बायोकेमिकल असते. बायोकेमिकल ची शरीराला अत्यंत गरज असते. बायोकेमिकल हे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती मजबूत ठेवते व आपल्याला रोगांपासून दूर ठेवते. त्यामुळे आपण आपल्या आहारात व्हिटॅमिन बी ची कमतरता भरून काढणाऱ्या पदार्थाचा समावेश करावा. जसे कि अंडी, चिकन, मासे यासारखे पदार्थ खावेत. 


व्हिटॅमिन डी  (Vitamin-D):


व्हिटॅमिन डी हे जीनवसत्त्व शरीरातील कॅल्शिअम आणि फॅास्फरसची उणीव भरून काढते. व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्याच्या प्रकाशापासून मिळते. पण अनेकदा डॅाक्टर आपल्याला व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी काही औषधेसुद्धा देतात. व्हिटॅमिन डी चा योग्य प्रमाणात समावेश केल्याने शरीरातील काही आजार किंवा श्वासोच्छासाच्या आजारांना दूर ठेवता येते. शिवाय रेस्पिरेटरी टॅक्ट इनफेक्शन आणि  रेस्पिरेटरी मसल्स या आजारापासून बचाव करता येतो. आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी या जीवनसत्त्वाचे प्रमाण योग्य प्रमाणात असणे फार गरजेचे आहे.


झिंक (Zinc) :


कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवण्यासाठी शरीराला झिंक या पोषकतत्वाची फार गरज असते. झिंकच्या कमतरतेमुळे लिफोसाइट्स पेशीमवर परिणाम होऊ शकते. लिफोसाइट्स पेशींचे प्रमाण योग्य असल्यास शरीरातील प्रतिकारशक्ती कायम सुरळीत राहते. त्यामुळे टी पेशींना चालना मिळते.


संबंधित बातम्या :