Love Marriage Relationship Tips : भारत (India) देशात जिथे आपल्या संस्कृतीला महत्त्व दिले जाते, लग्न केवळ दोन व्यक्तींमध्ये नाही तर दोन कुटुंबांमध्ये होते, अशी इथल्या लोकांची धारणा आहे. भारतात आजही प्रेमविवाह हा एक मोठा मुद्दा मानला जातो. अनेकदा लोक जोडप्याला प्रश्न विचारतात की, हे अरेंज्ड मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? भारतात अनेकदा जोडप्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रेमविवाहासाठी पटवून सांगावे लागते, त्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागते. या काळात, जोडप्यांच्या मनात एक भीती देखील असते की, त्यांचे पालक लग्नासाठी सहमत होतील की नाही? अनेकांना त्यांच्या पालकांची समजूत काढण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळे तुम्हालाही प्रेमविवाह करायचा असेल आणि त्यासाठी तुमच्या पालकांची संमती हवी असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.


संवाद साधणे आवश्यक


प्रत्येक मुलाचं आपल्या पालकांवर खूप प्रेम असतं, पण अनेक घरांमध्ये अनेक प्रकारच्या संवादाच्या सीमा असतात. काही घरांमध्ये संवादाच्या अभावामुळे पालक आणि मुलांच्या नात्यात मोठी दरी निर्माण होते. प्रेमविवाहासाठी तुम्हाला तुमच्या पालकांना पटवायचे असेल, तर तुम्हाला या सीमा तोडून त्यांचे मित्र व्हावे लागेल. तुमच्या पालकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा आणि तुमचा जोडीदार घरात आल्यानंतरही त्यांचे नाते तसेच राहील याची जाणीव त्यांना करून द्या.


लग्नाची चर्चा करताना...


पालकांशी संवाद साधत राहा, एकदा का ते तुमच्यासोबत अगदी संवाद साधू लागले की तुम्ही त्यांच्याकडे तुमच्या लग्नाच्या विषयावर चर्चा केली पाहिजे. त्यांना कोणत्या प्रकारची सून किंवा जावई हवा आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. या काळात, आपण स्वतः त्यांना सांगावं की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती आवडते. तुम्ही तुमचे शब्द हुशारीने वापरणे महत्त्वाचे आहे.


 


पालकांपैकी एकाचा विश्वास जिंकणे अत्यंत आवश्यक, बरं का!


पालकांसोबत संभाषण सुरू झाल्यानंतर लक्षात घ्या, की तुमच्या पालकांपैकी कोण तुमचे म्हणणे ऐकून घेतो? कोण तुम्हाला समजून घेतो. त्याचा स्वभाव ओळखायला शिका, आणि जर दोघांकडूनही संमती असेल तर, यापेक्षा चांगले काही नाही, परंतु तसे नसल्यास, तुम्हाला किमान एका पालकांना विश्वासात घ्यावे लागेल आणि नंतर तुमच्या जोडीदाराची त्यांच्याशी ओळख करून द्यावी लागेल.


 


नातेवाईकांकडून मदत घ्या..


सगळेच नातेवाईक प्रेमविवाहाच्या विरोधात नसतात. त्यांची मदत घ्या, विशेषत: जे तुमच्या स्वतःच्या पालकांपेक्षा मोठे आहेत आणि ज्यांचा ते आदर करतात. हे आजी आजोबा किंवा मोठे काका आणि काकू या लोकांची मदत घ्या. नशिबाने साथ दिली तर ते तुमच्या पालकांना पटवण्यात यशस्वी होतील.


 


जोडीदाराशी पालकांसोबत भेट घडवा..


आता सर्वात महत्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे तुम्हाला तुमच्या जोडीदाराची कुटुंबाशी ओळख करून देण्याची हीच ती वेळ आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची संपूर्ण माहिती तुमच्या जोडीदाराला द्यायला विसरू नका. अशा प्रकारे, तुमच्या पालकांचा स्वभाव तुमच्या जोडीदारालाही समजेल. आणि गोष्टी कशा हाताळायच्या? कोणत्या गोष्टी सांगायच्या हे समजेल.


 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


 


Relationship Tips : जोडीदारासोबतचं नातं छान हवंय? मग 'या' अपेक्षा ठेवू नका,  एकदा ट्राय करा, तुमचं नातं आणखी बहरेल!