Child Health: आपलं बाळ गोंडस.. गोरं गोमटं...गुटगुटीत दिसावं.. असं प्रत्येक पालकांना वाटतं. त्यासाठी ते बाळाच्या खाण्या-पिण्यासोबत विविध महागडे बेबी प्रॉडक्टचा वापरही करतात. विविध कंपन्या सध्या आपलं प्रॉडक्ट विकण्यासाठी ऑफर्स देताना दिसत आहे. अनेकदा सोशल मीडियावर, टीव्हीवर आपण विविध जाहिराती पाहतो, ज्यानंतर आपण अशा काही गोष्टींचा वापर करू लागतो ज्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात. नवजात मुलांसोबतही असेच काहीसे घडते. आपण टीव्हीवर बेबी पावडरच्या चकचकीत जाहिराती पाहतो आणि त्यात दाखवल्याप्रमाणे आपण त्या लावू लागतो, पण असे करणे त्यांच्यासाठी किती हानिकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?


 


अमेरिकेत बेबी पावडरशी संबंधित एक प्रकरण समोर


अनेक पालकांना आपल्या लहान मुलांना पावडर लावण्याची जणू सवयच लागली आहे. सोशल मीडिया आणि टीव्हीवर बेबी पावडरच्या जाहिराती अशा प्रकारे दाखवल्या जातात की, मुलांसाठी पावडर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 2021 मध्ये अमेरिकेत बेबी पावडरशी संबंधित एक प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये एका व्यक्तीला बेबी पावडरचा वास घेतल्याने कॅन्सर होण्याची भीती होती. यावर याचिका दाखल केल्यानंतर आता न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल देत प्रसिद्ध बेबी पावडर कंपनीला एक अब्ज रुपयांचा दंड ठोठावला आहे. अशा स्थितीत सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे बेबी पावडरमुळे खरंच कॅन्सर होतो का?


 


बेबी पावडरमुळे कर्करोग कसा होतो?


वास्तविक, बेबी पावडरमध्ये एक घटक आढळतो ज्याला एस्बेस्टोस म्हणतात. या संयुगातूनच कर्करोगाचे जंतू शरीरात शिरू लागतात. पीडितेने या पावडरचा वासही घेतला होता, ज्यामुळे कर्करोग झाला होता. लहान मुलांना बेबी पावडर लावल्यानेही फुफ्फुसाचा त्रासही होऊ शकतो.



बेबी पावडर लावताना या गोष्टी लक्षात ठेवा



  • मुलांजवळ कधीही बेबी पावडरचा बॉक्स ठेवू नका.

  • बेबी पावडर थेट लहान मुलांना कधीही लावू नका, 

  • ती लावण्यासाठी तळहातात थोडी पावडर घेऊन त्वचेवर लावा.

  • बेबी पावडर त्वचेच्या त्या भागांवर कधीही लावू नये ज्याद्वारे ती शरीरात पोहोचते.

  • डोळे, तोंड आणि नाकभोवती पावडर लावणे टाळा.

  • जर तुम्ही डायपर रॅशसाठी पावडर लावत असाल तर कमी लावा.

  • मुलाच्या कोणत्याही कपड्यावर पावडर असल्यास ती धुवा.

  • पावडर लावताना पंखा किंवा कुलर बंद करा, अन्यथा पावडर मुलांच्या डोळ्यात किंवा नाकात जाऊ शकते.

  • डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच मुलांवर पावडर वापरा.

  • जर मुलाची त्वचा नाजूक असेल तर पावडर टाळा.


 


हेही वाचा>>>


Child Health : पालकांनो.. सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवायचंय? तर फक्त हे काम करा, जाणून घ्या


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )