नवी मुंबई :  सिडकोतर्फे 26,000 घरांची विक्री महागृहनिर्माण योजनेद्वारे करण्यात येणार आहे.  'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या नावाने ही महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे.प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य विक्री याद्वारे या घरांची विक्री केली जाईल. सिडकोकडून नवी मुंबईतील वाशी, खारघर, खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसर, मानसरोवर, पनवेल, तळोजा व उलवे नोडमध्ये सदर घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या घरांसाठी नोंदणी 12 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. मात्र, सिडकोनं घरांच्या किमती जाहीर न केल्यानं नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. घरांसाठी अर्ज करणाऱ्यांकडून घरांच्या किंमतींबाबत विचारणा केली जात होती. अखेर पुढील आठवड्यात या घरांच्या किमती जाहीर होणार आहेत.  

सिडकोकडून नवी मुंबईतील घरांच्या किंमती प्रकल्पनिहाय जाहीर केल्या जाणार आहेत. नवी मुंबईतील 26 हजार घरांच्या किंमती तांत्रिक कारणामुळं जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. मात्र, येत्या आठवड्यात या घरांच्या किंमती जाहीर केल्या जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. सिडकोची 26 हजार घरं ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG)  यांच्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 67,000 घरे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात 26,000 घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 

सिडकोची घरं कुठं, कोणत्या भागात?

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक1. तळोजा, सेक्टर-28 : 2185  2. तळोजा, सेक्टर-39 : 7509  3. खारघर बस डेपो : 1700 4. खारकोपर 2 ए : 2885. खारकोपर 2बी : 288 6. कळंबोली बस डेपो : 1360 7. बामनडोंगरी : 1700 

अल्प उत्पन्न गटातील घरं कोणत्या भागात?

8. तळोजा, सेक्टर-37, अ्प उत्पन्न गट ए : 816 9. तळोजा, सेक्टर-37 ,अल्प उत्पन्न गट बी :  8 10. नवीन पनवेल (प.) बस टर्मिनस :  172 11. खारघर बस टर्मिनस :  340  12. मानसरोवर रेल्वे स्टेशन : 840 13. खांदेश्वर रेल्वे स्टेशन : 1470 14. खारकोपर-भूखंड क्र. 3, सेक्टर-16 ए : 2113  15. वाशी ट्रक टर्मिनल अल्प उत्पन्न गट : 3131 16. खारघर स्टेशन अल्प उत्पन्न गट बी : 1803

सिडकोच्या घरांचं चटई क्षेत्रफळ 322 स्क्वेअर फुट ते 540 स्क्वेअर फुट दरम्यान आहे. सिडकोच्या घरांचं चटई क्षेत्रफळ 322 स्क्वेअर फुट ते 540 स्क्वेअर फुट दरम्यान आहे. अर्जदारांना या सोडतीसाठी 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करत येईल.  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी ही योजना आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानाचा लाभही त्यांना घेता येईल.

इतर बातम्या :

खुशखबर! सिडकोच्या घरांची लॉटरी निघाली, नवी मुंबईत होणार हक्काचं घर, जाणून घ्या नेमका कुठे अर्ज करायचा?

CIDCO House Lottery : नवी मुंबईतील सिडको घरांच्या लॉटरीसाठी दोन गट, 250000 रुपयांचे मिळणार अनुदान, वाचा नेमक्या अटी काय?