Benefits of Camphor for Skin : कापूर पुजेच्या वेळी वापरला जातो, त्यामुळे वातावरण शुद्ध होते. कापूरमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आरोग्यासोबतच आपले सौंदर्य वाढवण्यासाठी खास काम करतात. वेदना, सर्दी किंवा इतर आरोग्य समस्या बरे करण्यासाठी फायदेशीर असलेल्या बाम, मलम यासारख्या गोष्टी बनवण्यासाठी याचा वापर सामान्यतः केला जातो. तसेच, त्वचेशी संबंधित समस्यांवरही हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. कापूर त्वचेला चमकदार करण्यासोबतच अनेक समस्या दूर करण्यातही मदत करतो. 
 
मुरुमांच्या समस्येसाठी कापूरचा वापर
मुरुमांची समस्येसाठी कापूरचा छोटा तुकडा घेऊन त्याची पावडर बनवा. आता त्यात ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि मुरुमांवर लावा. काही वेळ चेहऱ्यावर लावल्यानंतर स्वच्छ करा. ही पद्धत काही दिवस वापरून पाहा. 


तेलकट त्वचेसाठी फेस पॅक
तेलकटपासून मुक्ती मिळवण्यासाठी कपूरची पावडर, मुलतानी माती, बेसन किंवा तांदळाचे पीठ यामध्ये गुलाब पाणी मिसळून फेस पॅक तयार करा. हे चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्याबरोबरच, हे उघडे छिद्र कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. तुमचा चेहरा पूर्वीपेक्षा अधिक तजेलदार दिसेल.


भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका
हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्याचा त्रास होत असेल तर यासाठी तुम्ही कापूर वापरू शकता. यासाठी कोमट पाण्यात कापूर मिसळा आणि या पाण्यात काही मिनिटे पाय बुडवून ठेवा. यानंतर ब्रश किंवा लूफाच्या मदतीने थोडा वेळ स्क्रब करा. आता तुमचे पाय चांगले धुवा आणि त्यावर फ्रूट क्रीम किंवा तेल लावा. तुम्हाला फरक दिसेल. 


त्वचेची जळजळीची समस्या दूर होईल
हिवाळ्यात आंघोळ केल्यावर किंवा अनेक वेळा ओले कपडे घातल्याने त्वचेला खाज सुटणे सुरू होते. यासाठी तेलात थोडा कापूर मिसळा. आता सामान्य तेलाप्रमाणे हात आणि पायांना लावा. बॉडी लोशन बनवण्यासाठीही कापूर वापरला जातो. यामध्ये असलेले अँटीसेप्टिक आणि अँटी प्र्युरिटिक गुणधर्म त्वचेच्या जळजळीवर फायदेशीर मानले जातात.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha