73rd Republic Day : भारताचा आज 73 वा प्रजासत्ताक दिन आहे. देशभर जल्लोषाचे वातावरण आहे. राजधानी दिल्लीत दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. यासोबतच भव्य परेडही पाहायसा मिळणार आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी कोणते कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे, वाचा सविस्तर...


सर्वप्रथम, सकाळी 10.05 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, संरक्षण सचिव अजय कुमार आणि लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख पंतप्रधान पंतप्रधानांसोबत उपस्थित राहणार आहेत.


त्यानंतर 10.15 वाजता पंतप्रधान राजपथवर पोहोचतील. त्यानंतर 10.18 वाजता राष्ट्रपती राजपथवर पोहोचतील. देशाच्या पहिली महिला म्हणजेच राष्ट्रपतीच्या पत्नी 10.21 मिनिटांनी राजपथवर पोहोचतील. ठीक 10.23 वाजता, राष्ट्रपती राम नाथ कोविंद त्यांच्या ताफ्यासह आणि राष्ट्रपतींच्या घोडेस्वार अंगरक्षकांसह राजपथवर पोहोचतील.


10.26 वाजता ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत होईल. यावेळी 21 तोफांची सलामी दिली जाईल. 10.28 मिनिटांनी, अभिवादन मंचावर राष्ट्रपती जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे ASI बाबू राम यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करतील. त्यांची पत्नी रीता राणी यांना शांतता काळातील सर्वात मोठे शौर्य पदक मिळणार आहे.


10.30 वाजता हवाई दलाचे चार M17V5 हेलिकॉप्टर राजपथवरील आकाशात झेपावतील. यापैकी एका हेलिकॉप्टरवर तिरंगा असेल आणि इतर तीनवर लष्कराच्या तीन शाखांचे (सेना, हवाई दल आणि नौदल) झेंडे असतील. हे सर्व हेलिकॉप्टर प्रेक्षकांवर आकाशातून फुलांचा वर्षावही करतील. यासह 26 जानेवारीची परेड सुरू होईल. हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केल्यानंतर परेड कमांडर लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा राजपथवर पोहोचतील.


परेडचे सेकंड इन कमांड मेजर जनरल आलोक कक्कर यांच्या आगमनानंतर परेडची विधिवत सुरुवात होईल. या वर्षीपासून परेड सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे. दरवर्षी 10 वाजता सुरू व्हायची. मात्र, हवामानामुळे परेड अर्धा तास उशिराने सुरू होणार आहे. सर्वप्रथम, देशातील परमवीर चक्र विजेते आणि अशोक चक्र विजेते खुल्या जिप्सीमध्ये राजपथवर पोहोचतील आणि राष्ट्रपतींना अभिवादन करतील. यानंतर लष्कराचे 61 घोडदळाचे तुकडी दाखल होईल.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha