Calcium For Health : आजकाल बरेच लोक शाकाहारी आहाराला पसंती देऊ लागले आहेत. यामध्ये प्राण्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा वापर केला जात नाही. या आहारात तुम्ही कोणताही मांसाहार करू शकत नाही किंवा दुग्धजन्य पदार्थ वापरू शकत नाही. अशा परिस्थितीत अनेक वेळा शरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी पूर्ण करावी हा प्रश्न पडतो. बहुतेक लोकांना माहित आहे की दूध आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये भरपूर कॅल्शियम असते, परंतु तुम्ही शाकाहारी आहारात दूध किंवा त्यापासून बनवलेले काहीही खाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला कॅल्शियमचे असे 5 स्त्रोत सांगत आहोत, जे खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होईल.


1. तीळ : तीळ खाल्ल्याने शरीराला कॅल्शियम मिळते. एका चमचा तिळात सुमारे 88 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. कडधान्ये किंवा सॅलडमध्ये तीळ घालूनही त्याचा वापर करता येतो. तिळाचे लाडूही हिवाळ्यात छान लागतात. 


2. आवळा : आवळ्यामध्येही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. याशिवाय आवळ्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आवळा ज्यूस किंवा आवळा पावडरच्या स्वरूपातही तुम्ही खाऊ शकता. 


3. जिरे : जिरे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. जिरे खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होऊ शकते. यासाठी तुम्ही 1 ग्लास पाणी उकळा, आता त्यात 1 चमचा जिरे घाला. पाणी थंड करून दिवसातून किमान दोनदा प्या. 


4. नाचणी : नाचणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कॅल्शियमसाठी नाचणीचा आहारात समावेश करावा. नाचणीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. नाचणीची भाकरी शरीरासाठी फार पौष्टीक मानली जाते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :