IPL 2022 Final, GT vs RR: आयपीएलच्या 15व्या मोसमाची मेगा फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. यंदाच्या मोसमात नव्यानं दाखल झालेला गुजरात टायटन्स आणि 14 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेली राजस्थान रॉयल्स यांच्यात फायनलचा हा थरार पाहायला मिळणार आहे.  


गुजरातच्या टायटन्सचा जल्लोष...की राजस्थानचा 'रॉयल मार्च?' यापैकी नक्की काय पाहायला मिळणार याची उत्सुकता जगभरातल्या तमाम आयपीएल चाहत्यांना आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या मोसमाची मेगा फायनल आणि या मेगा फायनलमध्ये हार्दिक पंड्याची गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत.


Suggested Playing XI No.1 for GT vs RR Dream11 Team :
Keeper – जोस बटलर (C), वृद्धीमान साहा, संजू सॅमसन 


Batsmen – डेविड मिलर, शुभमन दिल, यशस्वी जायस्वाल 


All-rounders – हार्दिक पांड्या (VC), आर. अश्विन


Bowlers – राशिद खान, मोहम्मद शामी, ओबेद मकॉय 


Suggested Playing XI No.2 for GT vs RR Dream11 Team:
Keeper – जोस बटलर, वृद्धीमान साहा, संजू सॅमसन (C)


Batsmen – डेविड मिलर(VC),शुभमन गिल, देवदत्त पडिकल 


All-rounders – हार्दिक पांड्या, आर. अश्विन


Bowlers – राशिद खान, मोहम्मद शामी, युजवेंद्र चहल 


वेगवान गोलंदाजांना मदत
स्टेडियममध्ये पाच काळ्या मातीच्या आणि सहा लाल मातीच्या खेळपट्ट्या आहेत. लाल मातीच्या खेळपट्ट्यांपेक्षा काळ्या मातीच्या खेळपट्ट्यांवर चांगला बाऊन्स मिळतो. काळ्या मातीच्या खेळपट्ट्या लवकर सुकतात आणि फिरकीपटू किंवा संथ गोलंदाजांना मदत करतात. क्वालिफायर 2 मध्ये हे दिसले नसले तरी येथे वेगवान गोलंदाजांनी जास्त विकेट घेतल्या आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर धावा करणं खूप सोपं आहे. चांगली खेळपट्टी आणि वेगवान आउटफिल्ड म्हणजे फलंदाज काही चांगले फटके खेळू शकतात.


अहमदाबादमधील हवामानाचा अंदाज
अहमदाबादमध्ये रविवारी अंतिम सामन्याच्या दिवशी कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस असू शकते. तर, किमान तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील आणि रात्री तापमानात घट होऊ शकते. आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात पावसाचा धोका नाही. परंतु, येथे ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे.