Health Tips :  हिवाळ्यात (Health) मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली बोरं आरोग्यास (Health) गुणकारी आहे. अनेक आजारांवर बोरफळ उपयुक्त ठरते. बोर फळामुळे आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढते. बोरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हिवाळ्यात आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी 'हा' रानमेवा खा. छोटेसे बोर फळ (Bor fruit) आरोग्यास मोठे फायदेशीर आहे. बोरांमध्ये भरपूर पाणी आणि आर्द्रता आढळते. बोर फळ खाल्ल्याने नैसर्गिकरित्या चांगली झोप लागते.


पौष्टिक तत्व 


पोषक द्रव्यांसह बोर अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मांनी समृद्ध आहे. बोरांमध्ये सोडियम आणि लोह देखील मोठ्या प्रमाणात असते, जे आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकतात आणि शरीरातील पेशींना निरोगी बनवण्यास मदत करतात. बोर फळामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते, ते लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी खूप महत्वाचे आहे.


ऊर्जा बूस्टर 'बोर' फळाचे फायदे  


दाहक-विरोधी गुणधर्म 


बोर फळामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, त्याचे दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. बोरांमध्ये संसर्ग रोखण्याचे गुणधर्मही आहेत.


ऊर्जा स्त्रोत


बोरांमध्ये 'व्हिटॅमिन सी' मोठ्या प्रमाणात असते. या बोरांचे सेवन केल्याने शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. बोर हे 'ऊर्जा बूस्टर' फळ आहे. थकवा लवकर दूर करण्यासाठी बोर फळ खावे.


वजन नियंत्रण 



वजन कमी करणाऱ्यांसाठी बोर फळ अतिशय उत्तम आहे, कारण यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते.


त्वचेसाठी फायदेशीर 




बोरांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. त्वचेच्या मुरुम, काळे डाग, लाल चट्टे, सुरकुत्या या सर्व समस्यांपासून आराम मिळतो. 


अनेक आजारांवर उपयुक्त 



रसरशीत बोरांमध्ये कॅन्सर विरोधक गुणधर्म आहेत. बोर फळामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने यकृत, हृदय या संबंधित समस्या दूर होतात. बोराची साल बारीक करून डोळ्यांभोवती लावू ठेवल्यास डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते उत्तम ठरते. ॲनिमियाची समस्या असलेल्या लोकांनी बोराचे नियमित सेवन करावे. बोराचे सरबत प्यायल्यास दमा, खोकला आणि फुफ्फुसाच्या अनेक समस्यांवर आराम मिळतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी बोर फळ फायदेशीर ठरते.  बोर शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते.


पचनक्रिया सुधारते


थंडीच्या दिवसात बद्धकोष्ठता, गॅसेस अशा पोटाच्या समस्या उद्धवतात, त्यामुळे बोर फळ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते.


स्नायू बळकट होतात


बोरांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते. बोर खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात. सांधेदुखीवरही बोर फळ रामबाण उपाय आहे. हिवाळ्यात हा रानमेवा मोठ्या प्रमाणात आढळतो. उत्तम आरोग्यासाठी 'बोर फळ' महत्वाचे आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


महत्त्वाच्या बातम्या :


Hypertension : हिवाळ्यात रक्तदाब का वाढतो? जाणून घ्या त्याची कारणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती