Health Care : उन्हाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यामध्ये काही फळं खाल्यानंतर शरीर हायड्रेट राहते. उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आहारामध्ये लीचीचा समावेश केला पाहिजे. लीचीमुळे शरीर थंड राहते. तसेच  मेटाबॉलिज्म देखील मजबूत होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही लीचीचे सेवन करु शकता.  जाणून घेऊयात लीची खाण्याचे फायदे. 


लीची खाण्याचे फायदे


लीजीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे 80 टक्के हायड्रेटेड फळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या फळाचं सेवन करावं. 
लीची ह्रदयासाठी अत्यंत चांगले फळं आहे.  पोटॅशियमचे प्रमाण लीचीमध्ये जास्त असते. 
लीची खाल्ल्यानं शरीरामध्ये इम्यूनिटी वाढते. लीचीमध्ये जास्त प्रमाणात विटॅमिन सी असते.
गरोदर असणाऱ्या महिलांनी देखील लीचीचं सेवन करावं. कारण लीचीचा आहारामध्ये समावेश केल्यानं शरीरामध्ये लोहाचं प्रमाण वाढतं.
लीचीमध्ये अँटीऑक्सिडेट्स असतात. तसेच फायबरचे प्रमाण देखील लीचीमध्ये जास्त असतं.
लीची खाल्यानं पचन क्रिया मजबूत होते. त्यामुळे वजन कमी होते.
जर तुम्हाला गळ्यामध्ये खवखव जाणवत असेल किंवा सर्दी होत असेल तर तुम्ही लीचीचे सेवन करु शकता. त्यामुळे या समस्या कमी होतील. 
लीची खाल्यानं त्वचेवर ग्लो देखील येतो.  


अॅन्टी कॅन्सर प्रॉपर्टी: अनेक फळांमध्ये फ्लेवर्ड आणि अॅन्टी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो. पण लीचीमध्ये कीमोप्रोटेक्टिव्ह इफेक्ट्सही असतात. एका रिसर्चसनुसार, लीची ब्रेस्ट कॅन्सरच्या सेल्स नष्ट करण्यात मदत करते.लीची हे नैसर्गिक पेन किलर आहे. यामुळे डॅमेज टिश्यूज नीट होतं.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :