Home Remedies for Dark Circle : सध्या लोक बराच वेळ लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर काम करतात. झोप पूर्ण न झाल्याने आणि बराच वेळ लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर काम केल्याने तुम्हाला डार्क सर्कल्स येऊ शकतात जाणून घेऊयात डार्क सर्कल्स घालण्याची सोपी पद्धत-
1. शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही दिवभरात पाणी कमी पिले तरी देखील तुम्हाला डार्क सर्कल्स होऊ शकतात. दिवसभरातून कमीत कमी चार ते पाच लिटर पाणी पिले पाहिजे. तसेच रात्री झोपताना डोळ्यांवर आइस पॅक लावा त्याने देखील तुमचे डार्क सर्कल्स जातील.
2. घरच्या घरी डार्क सर्कल्स घालवायचे असतील तर दररोज ग्रीन टी प्या. ग्रीन टीमध्ये अॅंटीऑक्सीडेंट (Antioxidant)असतात. हे डोळ्यांच्या भागात रक्ताभिसरण (Blood Circulation) वाढवते. त्यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात.
3.एका रिपोर्टनुसार शरीरात जर लोहाचे प्रमाण कमी असेल तरी देखील डार्क सर्कल्स होतात. त्यामुळे पालक, ब्रॉकली, वटाणे यांसारख्या लोह असणाऱ्या भाज्या खाव्यात.
4. व्हिटॅमिन सी, कोजिक अॅसिड आणि हायलूरोनिक अॅसिड यूक्त क्रिम रोज डोळ्यांच्या बाजूला आलेल्या डार्क सर्कल्सला लावावी. रात्री झोपताना आणि सकाळी ही क्रिम लावल्याने काही दिवसांमध्येच तुमचे डार्क सर्कल्स निघून जातील.
सकाळी मेथीचे दाणे, ओव्याचं पाणी प्यायल्यानं झटपट कमी होईल वजन; 'या' आजांरावरही गुणकारी
5. डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी रोज सात ते आठ तास झोप घ्या. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि डार्क सर्कल्स जातात.
6. थंड दूधामध्ये कापसाचा बोळा भिजवून तो कापूस 15 मिनीटांसाठी डोळ्यावर ठेवा. त्यामुळे डोळ्यखाली आलेली काळी वर्तुळ म्हणजेच डार्क सर्कल्स कमी होती.
टीप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.