Importance Of Tulsi : ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात किंवा घरासमोर तुळशीचं वृंदावन असतं. शहरांमध्ये अनेकांकडे वृदावनं नसली तरी तुळशीचं रोपटं असतंच. ज्यांच्याकडे जागेची समस्या आहे त्यांच्याकडे छोट्याशा कुंडीत का होईना तुळस असतेच. तुळशीचे आपल्याला अनेक फायदे आहेत.  कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय आहे. तुळसीची तीन चार-पाने उखळत्या दूधात टाकून ते उपाशीपोटी घेतले तर तुमचे उत्तम आरोग्य राहते. तुळशीमधील अॅन्टी इन्फ्लेमेट्री तत्त्व साथीच्या आजारापासून तुम्हाला दूर ठेवते. तुळशीची तीन-चार पाने टाकून गरम दुधामध्ये घेतल्यास तुमच्या नर्व्हस सिसटीमला आराम पोहोचवतो आणि स्ट्रेस हार्मोन्सला नियंत्रित करते.
 
तुळस आणि दूध हे मिश्रण अॅन्टी ऑक्सीडेंट असल्याने तुमच्या इन्यून सिसटीमला बळकट करून कॅन्सरसारख्या रोगापासून दूर ठेवतं. याने शरीरातील युरिक अॅसिड कमी करून किडनी स्टोनला हळूहळू नष्ट करते


तुळशीमध्ये अॅन्टी बॅक्टेरियल तत्त्व असल्याने गालांची सुज, कोल्ड आणि ड्राय कफ नाहीसा करतो. तुळशीची तीन-चार पाने रोज उखळत्या दुधातून घेतल्यास डोकेदुखी समुळ नष्ट होते. तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. अनेक रोग बरे करण्यास आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही तुळशी खूप प्रभावी आहे. ही वनस्पती शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि जीवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाशी लढा देते. तुळशीच्या पाण्याचे आरोग्य मिळविण्यासाठी रोज हे पाणी रोज घ्या.


तुळशीमध्ये पानांमध्ये आणि फुलं म्हणजेच मंजिऱ्यांमध्ये अनेक प्रकारची रासायनिक तत्त्व आढळतात. जी अनेक आजारांना रोखून त्यांचा समूश नाश करण्याची ताकद ठेवतात. यामुळेच अनेक आजारांवरील औषधांमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. तुळस ही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य उपचारासाठी फायदेशीर आहे. या पानाचं विशेष म्हणजे ही व्यक्तीच्या प्रकृतीनुसार काम करते. तुळशीमधील बहुगुणांमुळे फक्त तुळशीची पानंच नाहीतर याचं खोड, फूल, बिया या भागांचाही आयुर्वेद आणि नेचरोपथीमध्ये उपचारांसाठी वापर केला जातो. कॅन्सरसारखा दुर्धर रोग असो वा सर्दी-खोकला तुळशीचा वापर हा अनेक शतकांपासून केला जात आहे.