मुंबई : भारतातील शहरी तरुणांमध्ये स्थूलपणाची समस्या वेगाने वाढत आहे. कोणत्याही शस्त्रक्रियेविना स्थूलपणाशी लढा देण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. अमित मायदेव आणि जगविख्यात बेरिअॅट्रिक सर्जन डॉ. मोहित भंडारी यांनी एकत्र येत 'एनलायटन' हे बेरिअॅट्रिक एण्डोस्कोपी केंद्र सुरु केलं आहे.

स्थूलपणा आणि व्हिसेरल फॅटचा (पोटाच्या पोकळीत जमा होणारी शरीरातील चरबी) त्रास असणाऱ्या तरुणांना या केंद्राची मदत होणार आहे. या डॉक्टर जोडीने आजवर 157 एण्डोस्कोपी स्लीव गॅस्ट्रोप्लास्टी (ईएसजी) प्रक्रिया केल्या आहेत आणि हा आकडा सातत्याने वाढत आहे. वीस ते चाळीस वर्ष वयोगटातील स्थूल व्यक्ती, विशेषत: ज्यांची बैठी जीवनशैली आहे, ते ईएसजीचा पर्याय स्वीकारतात.

डॉ. मोहित भंडारी हे इंदूरमधील मोहक बेरिअॅट्रिक्स अॅण्ड रोबोटिक्सचे संस्थापक संचालक आणि मुख्य सर्जन आहेत. डॉ. अमित मायदेव हे मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलच्या बालडोटा इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव सायन्सेसचे अध्यक्ष आहेत. आशियात सर्वाधिक बेरिअॅट्रिक सर्जरी करणाऱ्या डॉ. मोहित भंडारी यांनी 2017 साली भारतात ही प्रक्रिया पहिल्यांदा आणली. आजवर 52 महिला आणि 41 पुरुषांवर त्यांनी ईएसजी प्रक्रिया केली आहे. लवकरच इंदूर, मुंबई, हैदराबाद, दिल्ली आणि इतर प्रथम श्रेणी शहरांमध्ये एनलायटनची केंद्रे सुरु होणार आहेत.



ईएसजीची वैशिष्ट्ये काय?

ईएसजी ही सुरक्षित, वेगवान परिणाम देणारी प्रक्रिया आहे. कमीत कमी काळ हॉस्पिटलमध्ये रहावे लागतं. याशिवाय कोणत्याही प्रकारचा छेद न देता वजन कमी करण्याची खात्री आहे.

15 ते 20 किलो वजन कमी करायचं असून शस्त्रक्रियेची भीती वाटत असणाऱ्यांना ही प्रक्रिया उपयुक्त ठरते

कमी बीएमआय असूनही मधुमेह (लो बीएमआय डायबेटिस) आहे, त्यांच्यासाठी परिणामकारक

बेरिअॅट्रिक प्रक्रियेनंतरही ज्यांना अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत किंवा ज्यांनी काही प्रमाणात वजन कमी केले आहे, अशांना आता एंडोस्कोपिक तंत्रांमुळे या एंडोस्कोपिक रिव्हिजन प्रक्रियेतून वजन कमी करता येईल

एण्डोस्कोप  या कॅमेरा असलेल्या लवचिक नळीने आणि त्याला जोडलेल्या एण्डोस्कोपिक टाके घालण्याच्या उपकरणाने ही प्रक्रिया करण्यात येते. या सूक्ष्म कॅमेऱ्यामुळे डॉक्टर ही प्रक्रिया छेद न देता करु शकतात. पोटात घातलेले टाके पोटाची रचना बदलतात आणि शरीरात शोषल्या जाणाऱ्या कॅलरींवर मर्यादा आणतात. यानंतर सुरुवातील द्रव आहार सुरु करण्यात येतो. त्यानंतर सेमी सॉलिड आहार आणि नंतर सामान्य सकस आहार करण्यास परवानगी देण्यात येते. काही आठवड्यांमध्ये रुग्ण सामान्यपणे आयुष्य जगू लागतो.