Banana : केळी हे असं फळ आहे जे सर्वच सीझनमध्ये बाजारात उपलब्ध असते. केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये पोषक तत्व मोठ्या प्रमाणात आढळतात. जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. केळीचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी एप्रिल महिन्यातील तिसरा बुधवार हा राष्ट्रीय केळी दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने केळ्यांमध्ये कीटक का नसतात ? मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी केळ्यांचे सेवन करावे का? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


केळ्यांच्या सुमारे 33 जाती : 


केळी भारतात उपलब्ध असल्याने केळीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. भारतात केळीच्या सुमारे 33 जाती आहेत. केळीच्या अनेक जाती अतिशय चवदार असतात. 12 जाती त्यांचे विविध आकार आणि रंगांसाठी प्रसिद्ध आहेत. वेलची केळीला भारतात सर्वाधिक मागणी आहे. ही बिहार, ओरिसा इत्यादी राज्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय केळीच्या प्रसिद्ध जातींपैकी रस्थली केळी देखील एक आहे. हे झारखंड आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये आढळते. जगात केळीच्या 1000 पेक्षा जास्त जाती आढळतात. ही सर्व केळी सुमारे 50 गटांमध्ये विभागली आहेत.


मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी केळीचे सेवन करावे ? 


डॉक्टरांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी पूर्णपणे पिकलेली केळी खाणे टाळावे. त्याऐवजी कच्च्या केळ्याची भाजी खाऊ शकता. कच्च्या केळ्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राहते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण नसाल तर एक ते दोन केळी नक्की खा. केळी हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जात असले तरी त्याचे जास्त सेवन केल्याने उलट्या होणे, शरीरात सूज येणे, गॅस, लठ्ठपणा इत्यादी समस्या उद्भवू शकतात. जर तुमचे वजन कमी असेल तर केळी दुधात मिसळून रोज सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता. परंतु, हे लक्षात ठेवा की त्याचे जास्त सेवन करणे टाळा.


केळ्यांमध्ये कीटक का वाढत नाहीत?


केळ्यांमध्ये कीटक नसतात याचे कारण म्हणजे केळीच्या फळामध्ये सायनाइड नावाचे रसायन आढळते. त्यामुळे या फळात कीटक आढळत नाहीत. याशिवाय केळीमध्ये व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. हे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :