Asthama In Winter : हिवाळा (Winter Season) जसा मन प्रफुल्लित करणारा, गुलाबी थंडीचा महिना आहे. तसाच, हा ऋतू अनेक आजारांना देखील आमंत्रण देणारा आहे. यापैकीच एक त्रास म्हणजे दम्याचा (Asthama) आजार. हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांच्या समस्या वाढू लागतात. दमा ही एक श्‍वसनाची समस्या आहे. ज्यामध्‍ये रुग्णाच्या श्‍वसनमार्गात सूज आणि अडथळे निर्माण होतात. या कारणाने रुग्णाला श्‍वास घेण्यास त्रास होतो आणि खोकल्याचा त्रासही होतो. त्यामुळे थंडीची चाहूल लागताच दम्याच्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्याच्या काळात दम्याच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


ऍलर्जीपासून दूर राहा 


हिवाळ्यात शक्यतो धूळ आणि मातीच्या संपर्कात येणं टाळा. कारण त्यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. हिवाळ्यात लोक शेकोटी पेटवतात. अशा ठिकाणांपासून दूर राहा. तसेच, तुमचे बेड आणि रूम स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यावर धूळ साचणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करा.


धूम्रपानापासून अंतर ठेवा


धूम्रपान करणं ही कोणत्याही ऋतूत चांगली सवय नाही. पण, दम्याच्या रुग्णांना विशेषतः हिवाळ्यात या सवयीचा त्रास होतो. धूम्रपान करणाऱ्या रूग्णांनी केवळ त्यापासून दूरच राहावं असं नाही तर कोणीही धूम्रपान करू नये.


शरीर उबदार ठेवा


तुम्ही दम्याचे रुग्ण असाल तर या ऋतूत तुमचे शरीर उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, गरम पदार्थांचं सेवन करा. या दिवसांत लोकरीच्या कपड्यांसह तुमच्या शरीराचे रक्षण करा.


भरपूर पाणी प्या


हिवाळ्याच्या दिवसांत, लोक अनेकदा कमी पाणी पिण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. तुम्ही ही चूक अजिबात करू नये. पाण्याच्या कमतरतेमुळे फुफ्फुसात श्लेष्मा जमा होऊ लागतो, ज्यामुळे तुमची दम्याची समस्या वाढू शकते.


परफ्यूमपासून दूर राहा


दम्याच्या रुग्णांनी रूम फ्रेशनर किंवा परफ्यूम यांसारख्या गोष्टींपासून दूर राहावे. त्यांच्या संपर्कात आल्याने दम्याचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. दम्याच्या रूग्णांनी हिवाळ्यात इनहेलर नेहमी आपल्याबरोबर ठेवा आणि कोणत्याही समस्या वाढल्या किंवा संशय आल्यास, आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : हिवाळ्यात वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करायचाय? 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करा