Health Tips : हिवाळ्यात (Winter Season) साधारणपणे पाहायला गेलं तर अनेक आजारांचा धोका वाढतो. वातावरणात थंडावा असल्या कारणाने या दिवसांत आपली रोगप्रतिकारकशक्ती (Immunity) देखील कमी होते. अशा वेळी आली बदलती जीवनशैली (Lifestyle) हे अनेक आजार पसरविण्यात, निर्माण होण्यात फार महत्त्वाची भूमिका बजावतात. सध्याच्या दिवसांत कोलेस्ट्रॉल वाढणं ही देखील एक मोठी गंभीर समस्या झाली आहे. हिवाळ्यात, याच्या संबंधित अनेक केसेस वाढू लागतात.  


कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये आढळतो. हा चांगला आणि वाईट अशा दोन प्रकारचा असतो. उच्च घनता लिपोप्रोटीन(HDL) याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात. शरीरातील ऊती तयार करण्यात आणि योग्य रक्ताभिसरण राखण्यात हे मोठी भूमिका बजावतात. तसेच, कमी घनतेचे लिपोप्रोटीन (LDL), ज्याला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात, ते हृदयाच्या धमन्यांवर जमा होते आणि मार्गात अडथळा निर्माण करते. रक्त हृदयापर्यंत पोहोचते. अशा वेळी या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा आहारात समावेश करून तुम्ही खराब कोलेस्ट्रॉलची समस्या टाळू शकता.


ड्रायफूट्स


ड्रायफूट्स खाऊन तुम्ही लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल टाळू शकता. यामध्ये मल्टीविटामिन आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. अंजीर, अक्रोड आणि बदामाचे सेवन हा देखील एक चांगला पर्याय आहे. बदामात जास्त कॅलरीज असल्यामुळे ते कमी प्रमाणातच खावे.


डाळी


वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी डाळी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये असलेले फायबर लो डेन्सिटी लिपोप्रोटीन कमी करते. याशिवाय, संपूर्ण किंवा अंकुरलेले धान्य देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक प्रभावी आहार आहे. त्यामुळे उशीर न करता तुमच्या नाश्त्यात त्यांचा समावेश करा.


एवोकॅडो


एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, खराब कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड खूप उपयुक्त आहेत. हे एवोकॅडोमध्ये आढळते. त्यामुळे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी एवोकॅडो खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय फॅट कमी होण्यासही मदत होते. 


हिरव्या पालेभाज्या


हिरव्या पालेभाज्या नेहमीच सुपरफूड मानल्या जातात. त्यांचे सेवन केल्याने अनेक आजारांचा धोका टळतो. अशा परिस्थितीत, खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. फ्लॉवर, कोबी, पालक, टोमॅटो या भाज्या वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्तम आहेत.


ओमेगा -3 फॅटी ऍसिड


Omega-3 फॅटी अॅसिड वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. त्यामुळे रक्तदाब आणि रक्त गोठण्याच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. हे सॅल्मन किंवा ट्यूना माशांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय, व्हेज पर्यायांमध्ये तुम्ही मोहरी किंवा नाचणी, ज्वारी, बाजरी आणि चिया सीड्स देखील घेऊ शकता.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या