Asafetida Benefits : हिंगामध्ये अँटीबायोटिक, अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल संयुगे असतात. पोटदुखी, श्वासोच्छवासाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी आणि स्त्री-पुरुष दोघांमध्ये पुनरुत्पादक आरोग्य सुधारण्यासाठी पारंपारिक उपाय म्हणून हिंग वापरले जाते. याशिवाय लहान मुलांना सर्दी आणि फ्लूची समस्या असल्यास त्यावरही हिंगाची पेस्ट लावली जाते. ही हिंगाची पेस्ट छातीभोवती आणि नाकाखाली लावले जाते. चला तर, जाणून घेऊया हिंगाचे इतर अनेक फायदे...
मोहरीचे तेल आणि हिंग पावडरने मसाज करणे : ज्या लोकांना हिंगची चव आवडत नाही, ते लोक पोटफुगीपासून त्वरित आराम मिळण्यासाठी त्यांच्या नाभीवर हिंग पावडर आणि मोहरीच्या तेलाची मालिश करू शकतात. याशिवाय पोटात दुखत असेल, तरीही हा उपाय खूप फायदेशीर आहे.
आल्यामध्ये हिंग पावडर मिसळून खाणे : आल्यासोबत हिंग मिसळून खाऊ शकता, हा पोटदुखी कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. याशिवाय अपचनाची समस्या दूर होण्यासही मदत होते. आले आणि हिंग, दोन्ही घटक मिळून तुमच्या पोटासाठी कमालीचे काम करतात. आले पाचक एन्झाईम्स गतिमान करते आणि हिंग अन्नाचे पचन होण्यास मदत करते.
पाण्यात मिसळून पिणे : पोटदुखी अनेकदा अपचन आणि गॅसमुळे होते. अशा वेळी हिंग दोन्हीसाठी कमालीचे काम करते. खरं तर, हे द्रावण रोज जेवणानंतर प्यायल्याने पोटाला खूप फायदा होतो.
हिंगचा चहा पिणे : एक कप गरम पाण्यात आले पावडर, खडे मीठ आणि चिमूटभर हिंग मिसळा, आता त्याचा चहा बनवा. अॅसिडीटी आणि पोट फुगीपासून झटपट आराम मिळण्यास मदत होते, तसेच हा हिंगाचा चहा पोटदुखीवरही उपयुक्त आहे.
जेवणात हिंग टाका : जेवणात हिंग टाकण्याची परंपरा खूप जुनी आहे, त्यामुळे जेवणाची चव वाढते आणि गॅसची समस्या कमी होते. याशिवाय पचायला जड पदार्थांमध्ये हिंगाचा समावेश करण्याचीही सूचना दिली जाते. तसेच, चिमूटभर हिंग पावडर अपचनाचीही समस्या कमी करण्यास मदत करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :