IND vs PAK Womens World Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तान संघाला चांगलीच धूळ चारली आहे. भारताने 107 धावांनी पाकिस्तानवर दणदणित विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानला 245 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, पाकिस्तानी संघाला ते पेलता आलेलं नाही. पाकिस्तानी संघ 137 धावांवर ऑलआऊट झाला. भारताने तुफान गोलंदाजी करत हा सामना खिशात घातला आहे.
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. वैशाली शर्मा खाते न उघडताच बाद झाली. मात्र, त्यानंतर स्मृती मंधाना, स्नेह राणा आणि नवोदित पूजा वस्त्राकरच्या अर्धशतकी खेळीने भारताचे सामन्यात पुनरामगन झाले. त्यामुळे टीम इंडियाला 244 धावसंख्या गाठता आली.
पाकिस्ताननेही सामन्यात खराब सुरुवात केली. राजेश्वरी गायकवाडने अवघ्या 11 धावांवर जव्हेरिया खानला बाद केले. या सामन्यात राजेश्वरी गायकवाडने तुफान गोलंदाजी केली, ज्यामुळे भारताला चार विकेट घेता आल्या. 47 ओव्हरमध्ये पाकिस्तानी संघाचं आव्हान संपुष्टात आलं. 245 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ केवळ 137 धावा करू शकला. या सामन्यात पाकिस्तानचा संघ सुरुवातीपासूनच दडपणाखाली दिसला.
पाकिस्तान महिला संघाने 28 धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर संघाने वारंवार मध्यंतराने विकेट्स गमावल्या. पाकिस्तानकडून सलामीवीर सिद्रा अमीनने सर्वाधिक 30 धावा केल्या. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने 4 बळी घेतले. फलंदाजीत जबरदस्त फटकेबाजी करणाऱ्या स्नेह राणाने गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी करत पाकिस्तानकडून 2 बळी घेतले. झुलन गोस्वामीनेही दोन बळी घेतले. त्याचवेळी दीप्ती शर्मा आणि मेघना सिंगने प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताची धावसंख्या :
- स्मृती मंधाना 52
- शैफाली वर्मा 00
- दिपाली शर्मा 40
- मिताली राज 09
- हरमनप्रीत कौर 05
- रिचा घोष 01
- स्नेह राणा 53*
- पूजा वस्त्राकर 67
- झूलन गोस्वामी 06*
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Viral News : साप आणि विंचूचं डिटॉक्स सूप, प्यायला लोक उत्सुक, तुम्ही पाहिलं का?
- Viral : डायनासोरपेक्षा जुना आहे 'हा' प्राणी, इतका धोकादायक आहे की काही मिनिटांत मरतो माणूस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha