Deputy cm Ajit Pawar : आपल्या आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे नागपूरच्या मेट्रोचे काम पूर्ण झाले. त्याचप्रमाणे इतर शहरातील मेट्रोची कामे वेगानं सुरु करण्यासाठी आपण सहकार्य करावं, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केले. मेट्रोच्या कामात कोणत्याही प्रकारचे राजकारण नको, असेही ते यावेळी म्हणाले. विकासात कोणतेही राजकारण न आणता सर्वांनी एकजूटीने  काम करावे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.


नागपूरच्या मेट्रोचे काम ज्या पद्धतीने वेगाने झाले, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या मेट्रोचे काम देखील वेगाने सुरु होण्यासाठी आपल्याकडून मदत मिळावी. विकासात कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता एकजूटीने काम करु असा विश्वास पंतप्रधानांना देतो असे अजित पवार यावेळी म्हणाले. पुढच्या काळात शासनाकडून खरेदी येणारी वाहने पर्यावरणपूरक असतील असे अजित पवार यावेळी म्हणाले. 


आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करम्यात आला. एकूण 33 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदींनी पुणे मेट्रो आराखड्याची पाहणी केली. यानंतर मोदींनी मेट्रोचं मोबाईल तिकीट देखील काढले. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयात आयोजीत केलेल्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचे पुण्यातील जनतेच्या राज्याच्या वतीने स्वागत केले. ही भुमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी तुम्ही वेळोवेळी सहकार्य केले त्यासाठी तुमचे आभार मानतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले. 


आताच्या मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण होण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली असा विस्तार होण्याची गरज असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. यासाठी आपण आवश्यक ती मदत कराल अशी अपेक्षा देखील अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. नदी सुधार प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नदीची सुरक्षीतता, पर्यवरणाचे रक्षण जैववैविध्य, याचा विचार करावा लागणार असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: