Air Pollution Effect On Eyes : प्रदूषणाची समस्या तशी नेहमीचीच आहे. मात्र, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना सुरु होताच हवेची गुणवत्ता ढासळू लागते. AQI ची श्रेणी प्रत्येक ठिकाणी खराब होत जाते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांत जळजळ होणे यांसारख्या आरोग्याशी संबंधित अनेक तक्रारी उद्भवतात. बहुतेक तक्रारी डोळ्यांच्या संबंधित दिसतात. हवेच्या प्रदूषणामुळे आजकाल प्रत्येकाला त्रास होऊ लागला आहे. तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर यापासून वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.


प्रदूषणापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे? 


1. डोळे थंड पाण्याने धुवा : डोळ्यांना काही त्रास होत असेल तर सर्वप्रथम डोळे थंड पाण्याने धुवावेत. प्रदूषणामुळे तुम्हाला जळजळ होत असेल तर तुम्ही तुमचे डोळे वारंवार थंड पाण्याने धुवावेत. कारण या कार्बन ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडच्या उच्च एकाग्रतेमुळे चिडचिड होऊ शकते.


2. चष्मा वापरा : जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांना वायू प्रदूषणापासून वाचवायचे असेल, तर तुम्ही बाहेर जाताना चष्मा वापरण्याचा प्रयत्न करा. कारण चष्मा तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करतो. अशा वेळी प्रदूषणाचा थेट परिणाम तुमच्या डोळ्यांवर नाही, तर तुमच्या चष्म्यावर होईल.


3. स्क्रीन उपकरणांपासून दूर राहा : डोळ्यांना जास्त त्रास होत असल्यास, डोळ्यांना विश्रांती देण्याचा प्रयत्न करा, मोबाईल फोन आणि लॅपटॉपसारख्या स्क्रीन उपकरणांचा वापर शक्य तितका कमी करा. आवश्यक असेल तेव्हाच मोबाईल किंवा लॅपटॉप  वापरा. यासोबतच भरपूर पाणी प्या कारण डोळे कोरडे होण्याचा धोका असतो.


4. सकस आहार घ्या : वायू प्रदूषणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही सकस आहारही घेणे आवश्यक आहे. हे तुम्हाला आंतरिक सुरक्षा देते. तुमच्या आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा, ज्यात भरपूर जीवनसत्त्वे आहेत आणि तुमच्या डोळ्यांनाही फायदा होईल. अशा वेळी गाजर आणि पालक हिरव्या भाज्या खाणे खूप फायदेशीर मानले जाते.


5. डोळ्यांचा मेकअप करू नका : जर तुम्ही बाहेर जात असाल तर यावेळी डोळ्यांचा मेकअप करणं टाळा. कारण यावेळी डोळ्यांचा मेकअप केल्यास डोळ्यांना नुकसान होऊ शकते. मेकअपमुळे डोळ्यांवर प्रदूषणामुळे जळजळ होते, आणि डोळ्यांना खाज येते. अशा स्थितीत मेकअप आणि प्रदूषण मिळून डोळ्यांना हानी पोहोचते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : थकवा जाणवत असेल तर झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी 'हे' 5 पदार्थ नेहमी जवळ ठेवा; दिवसभर उत्साही राहाल