6th July 2022 Important Events :  जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 6 जुलैचे दिनविशेष.


 


1837 - रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म 6 जुलै 1837 रोजी झाला. ते भारतीय विद्वान, प्राच्यविद्यावादी आणि समाजसुधारक होते.


1890 - धन गोपाल मुखर्जी यांचा जन्म 6 जुलै 1890 रोजी कलकत्त्याजवळील एका गावात झाला. ते अमेरिकेतील पहिले यशस्वी भारतीय व्यक्ती होते. 1928 मध्ये त्यांनी न्यूबेरी पदक जिंकले.



1892 - ब्रिटनमध्ये दादाभाई नौरोजी हे पहिले भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले.


1901 - डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा जन्म 6 जुलै 1901 रोजी कोलकाता (तेव्हा कलकत्ता) येथे झाला. ते भारतीय जनसंघाचे संस्थापक होतो. 1929 मध्ये, त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, जेव्हा ते बंगाल विधान परिषदेत कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेस उमेदवार म्हणून सामील झाले.


1924 - माहीम बोरा यांचा जन्म सोनितपूर जिल्ह्यातील चहाच्या मळ्यात 6 जुलै 1924 रोजी झाला. ते एक लघुकथा लेखक आणि कवी होते. 2001 मध्ये 'इधनी माहिर हंही' या त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय कामासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.


1956 - अनिल माधव दवे यांचा जन्म 6 जुलै 1956 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील बडनगर गावात झाला. ते नर्मदा संवर्धनाच्या कामासाठी प्रसिद्ध होते. ते भारतीय पर्यावरणवादी आणि राजकारणी होते. ते भाजपचे सदस्य होते आणि त्यांनी पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री म्हणून काम केले होते.


1986 - जगजीवन राम यांचे 6 जुलै 1986 रोजी निधन झाले. ते भारतीय राजकारणी, सरकारी अधिकारी आणि दलितांचे दीर्घकाळ प्रमुख प्रवक्ते होते. 40 वर्षांहून अधिक काळ त्यांनी लोकसभेत काम केले. ते बाबूजी या नावाने प्रसिद्ध होते.


2002 - धीरजलाल हिराचंद अंबानी यांचे 6 जुलै 2002 रोजी मुंबई, भारत येथे निधन झाले. ते धीरूभाई अंबानी या नावाने प्रसिद्ध होते. रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना करणारे ते यशस्वी व्यक्तिमत्व होते.


महत्वाच्या बातम्या :