4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 4 जुलैचे दिनविशेष.


1902 : भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद पुण्यतिथी. 


स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी, 1863 रोजी झाला. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. १८९३ मध्ये शिकागो, अमेरिका येथे भरलेल्या जागतिक धर्म महासभेत त्यांनी भारताच्या वतीने सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले. स्वामी विवेकानंदांच्या वक्तृत्वामुळेच भारताचा वेदांत अमेरिका आणि युरोपातील प्रत्येक देशात पोहोचला. त्यांनी 'रामकृष्ण मिशन' या नावाची संन्याशांची संस्था स्थापन केली. 


1936 : ’अमरज्योती’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईच्या ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला.


1999 : विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार आणि बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचे निधन.


1826 : साली अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या दिनी अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन ऐडम्स(John Adams) आणि अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन(Thomas Jefferson) यांचे निधन झाले.


1934 : साली नोबल पारितोषिक पुरस्कार प्राप्त पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ मेरी क्युरी(Marie Curie) यांचे निधन.


1995 : साली टाटा मुलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरव्हेव रेडिओ तेलीस्कोपचे (GMRT) चे संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. सरकारचा बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात आला.


महत्वाच्या बातम्या :