1st July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 1 जुलैचे दिनविशेष.


1 जुलै : National Doctor’s day (जागतिक डॉक्टर्स दिन)


प्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी भारतात 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा केला जातो. 1991 मध्ये पहिला राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा करण्यात आला.


1 जुलै : वसंतराव नाईक जयंती.


वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी आणि राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ते सर्वाधिक काळ म्हणजेच 11 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. नाईकांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. ते पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष होते. नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती आणि रोजगार हमी योजनेचे जनक समजले जातात. इ.स. 1972 मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना मदतीच्या अनेक योजना राबविल्या. 


1 जुलै : महाराष्ट्र कृषी दिन


राज्यात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. या निमित्ताने 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 


1 जुलै : GST दिन. 


GST म्हणजे Goods (वस्तू) and Service Tax (सेवा कर). जीएसटी हा ग्राहकांवर वस्तू किंवा सेवांच्या खरेदीच्या बदल्यात कर म्हणून लावण्यात येत असतो. आपल्या देशातील पूर्वीची कर प्रणाली बदलून नवीन कर प्रणाली (GST) आपल्या देशातील केंद्र सरकारच्या वतीने 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आली. 


1 जुलै : National CA day


सन 1949 मध्ये भारतीय संसदेने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ची स्थापना केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 1 जुलै हा सीए दिवस म्हणून साजरा केला जातो. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे यावर्षी स्थापनेचा 74 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.


1955 : ’स्टेट बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट 1955’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली. याआधी ही बँक इंपिरिअल बँक या नावाने ओळखली जात होती.


1909 : क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.


1941 : सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते आणि श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री यांचे निधन.


महत्वाच्या बातम्या :