4th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. आज 4 ऑगस्ट आजचा दिवस म्हणजे श्रावणातील मंगळागौरीपूजनाचा दिवस. श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 4 ऑगस्ट दिनविशेष.
1914 : पहिले महायुद्ध
4 ऑगस्ट 1914 रोजी जर्मनीने बेल्जियमवर केलेल्या हल्ल्याने पहिले महायुद्ध सुरू झाले. पहिल्या महायुद्धाला इंग्रजीत 'द ग्रेट वॉर' असेही म्हटले जाते.
1956 : भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
आशियातील पहिली संशोधन अणुभट्टी ऑगस्ट 1956 मध्ये तुर्भे येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात कार्यान्वित झाली होती. पाच दशकांहून अधिक काळाच्या अविरत सेवेनंतर 2009 मध्ये ती बंद करण्यात आली.
2001 : भारतातील पहिली स्किन बॅंक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन
मरणोत्तर त्वचादान करून दुसऱ्यांना जीवनदान देणारी भारतातील पहिली स्किन बॅंक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.
2007 : नासाचे फिनिक्स अंतराळ यान प्रक्षेपित करण्यात आले.
नासाचे फिनिक्स अंतराळ यान प्रक्षेपित करण्यात आले. 4 ऑगस्ट 2007 रोजी प्रक्षेपित झाल्यापासून संयुक्त टीम डीप स्पेस नेटवर्कद्वारे अंतराळयानाच्या दैनंदिन संपर्कात राहिली.
2020 : लेबलॉनमधील बेरूत झालेल्या भीषण स्पोटामध्ये 220 पेक्षा अधिक ठार
4 ऑगस्ट 2020 साली लेबलॉनमधील बेरूत येथे झालेल्या भीषण स्फोटामध्ये 220 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर 300000 हून अधिक बेघर झाले.
1730 : पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म
सदाशिवराव भाऊ हे मराठा साम्राज्यातील एक सेनापती होते. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला.
1863 : वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्मदिन
पतंजलीच्या संस्कृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा 4 ऑगस्ट 1863 साली जन्म झाला. तर 14 ऑक्टोबर 1942 मध्ये त्यांचे निधन झाले.
1994 : नारायण सीताराम यांचा जन्म
नारायण सीताराम फडके हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते.
1929 : किशोर कुमार यांचा जन्म
किशोर कुमार यांचे नाव मनोरंजनसृष्टीत आदराने घेतले जाते. किशोर कुमार पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि पटकथालेखक होते. 4 ऑगस्ट 1929 रोजी त्यांचा जन्म झाला.
1931 : शिवाजीराव पाटील यांचा जन्मदिन
शिवाजीराव पाटील हे महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते. माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटवर्तीय सल्लागार म्हणून ते ओळखले जात.
1950 : भारतीय वकील आणि राजकारणी एन. रंगास्वामी यांचा जन्म
1961 : बराक ओबामा यांचा जन्म
बराक ओबामा हे अमेरिकेचे 44 वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. ते पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रध्यक्ष होते. तसेच ते नोबेल पारितोषिक विजेते आहेत.
1060 : फ्रान्सचा पहिला राजा हेन्री यांचे निधन
1060 मध्ये फ्रान्सचा पहिला राजा हेन्री यांचे निधन झाले. 4 मे 1008 मध्ये हेन्रीचा जन्म झाला होता.
संबंधित बातम्या