2nd August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. आज 2 ऑगस्ट आजचा दिवस म्हणजे श्रावणातील मंगळागौरीपूजनाचा दिवस. श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 2 ऑगस्ट दिनविशेष.
2 ऑगस्ट : नागपंचमी.
2 ऑगस्ट : मंगळागौरी पूजन.
श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते.
1861 : आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, त्यांनी ’बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी काढली. 1896 मधे त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोग करुन मर्क्युरस नायट्रेटची निर्मिती केली. त्यांना ’मास्टर ऑफ नायट्रेटस’ म्हणत असत.
1979 साली महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोर गरिबांसाठी आरोग्य सेवा सुरु करणारे दापत्य डॉ. रजनीकांत आरोळे आणि त्यांच्या पत्नीस रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1922 साली दूरध्वनी यंत्राचे जनक अमेरिकन वैज्ञानिक आणि अभियंता अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (Alexander Graham Bell) यांचे निधन.
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवाज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला. 1885 मध्ये ते अमेरिकन टेलिफोन कंपनीचे सह-संस्थापक सुद्धा होते.
महत्वाच्या बातम्या :