मुंबई : रोबोटीक सर्जरीचा विकास देशात झपाट्याने होत आहे. त्यामुळे 2020 पर्यंत 25 शहरातील शंभरपेक्षा जास्त रुग्णालयामध्ये 3 डी व्हिजनवाल्या डेक्सटरस रोबोटची मदत घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात वटिकुटी फाउन्डेशनचे राज वेटिकुटी म्हणाले की, "2015 मध्ये देशात एकूण 4000 रोबोटीक सर्जरी करण्यात आल्या आहेत. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हा आकडा खूपच मोठा आहे."
रोबोटीक सर्जरीद्वारे गायनॅकोलॉजिकल, डोके किंवा गळ्याच्या आजारांसाठी, आतड्यांच्या आजारांवर उपचार केले जातात. यामध्ये चुकांचीही शक्यता कमी असते. याशिवाय कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचारासाठी रोबोटीक सर्जरीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
सध्या देशात 30 रुग्णालयात 190 रोबोटीक सर्जन आहेत. 2020 पर्यंत ही संख्या वाढवून शंभर शहरामधून 500 रोबोटीक सर्जनची संख्या करण्याची योजना आखली जात आहे.