भारतीय पुरुष धावपटूंनी रविवारी झालेल्या इंटरनॅशनल स्पिरंट अॅन्ड रिले टीम कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून नवा इतिहास रचला आहे. या स्पर्धेमध्ये पुरुष रिले संघाने धावताना ४ X ४०० मीटर रिलेमध्ये ३.०२.१७ सेकंदामध्ये ही स्पर्धा पूर्ण केली. भारतीय संघाने हा नवा विक्रम नोंदवला आहे. १९९८ साली बँकॉक एशियन गेम्स मध्ये ३.०२.६२ सेकंदाचा विक्रम नोंदवण्यात आला होता.
तर दुसरीकडे भारतीय महिला संघाने ४ X ४०० मीटर रेसमध्ये ३.३०.१६ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. यामुळे भारतीय महिला संघ १२ व्या स्थानावर पोहोचला असून त्यांनी आपली ऑलम्पिकसाठीची आपली दावेदारी अधिकच प्रबळ केली आहे.