मुंबई: अमेरिकेच्या मिशिगन प्रांतातील पिसिलॅटमध्ये एक २५ वर्षीय तरुण तब्बल दीड वर्षे विना हृदय जगू शकला आहे. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, या तरुणाचे मे महिन्यात हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. पण यापूर्वी हा तरुण तब्बल ५५५ दिवस विना हृदय जिवंत होता.

 

स्टॅन लार्किन असे या तरुणाचे नाव असून नोव्हेंबर २०१४मध्ये हृदय दोषामुळे त्याचे हृदय त्याच्या शरिरातून काढण्यात आले होते. या नंतर त्याला एक कृत्रिम हृदय बसविण्यात आले होते.

 

स्टॅन सध्या रुग्णालयातच उपचार घेत असून त्याला पुढील आठवड्यात रुग्णालयातून सुट्टी मिळू शकते.