2nd September 2022 Important Events : विविध सणवारांचा ऑगस्ट महिना संपून आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात गणपतीचे आगमन झाले आहे. घरोघरी गणपती विराजमान झाले आहेत. तसेच पितृपक्ष पंधरवडा सुद्धा याच महिन्यात येतो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 2 सप्टेंबरचे दिनविशेष.
जागतिक नारळ दिन (World Coconut Day)
नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते. नारळापासून निर्माण होणाऱ्या सगळ्याच गोष्टी या मनुष्याला उपयोगी पडतात. नारळाचा उपयोग खाण्यासाठी, औषधांसाठी, तेलासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. नारळाच्या लागवडीपासून जगातल्या अनेक देशांत चांगला रोजगार मिळत आहे. त्यामुळे नारळाचे महत्व आणि त्याचा वापर याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो.
1 ते 7 सप्टेंबर : राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week)
भारतीय जनतेमध्ये पोषण आणि निरोगी खाण्याच्या सवयींबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह पाळला जातो. लोकांना पौष्टिक आणि अनुकूल खाण्याच्या सवयींचे महत्त्व समजावे यासाठी हा आठवडा पाळला जातो जेणेकरून ते आजारमुक्त निरोगी जीवनशैली राखू शकतील.
1999 : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.
1970 साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपले अपोलो हे चंद्र मिशन काही कारणास्तव रद्द केले.
1573 : अकबराने अहमदाबादजवळ निर्णायक युद्ध जिंकले आणि गुजरात ताब्यात घेतला. या विजयाच्या आनंदात बुलंद दरवाजा बांधण्यात आला.
1945 : सहा वर्ष चाललेले दुसरे महायुद्ध जपानने पराभव स्वीकारल्यानंतर संपले.
1946 : जवाहरलाल नेहरू यांच्या उपअध्यक्षतेखाली भारताच्या अंतरिम सरकारची स्थापना.
1969 : पहिले ऑटोमॅटिक टेलर मशीन (ATM) न्यूयॉर्क, यूएसए येथे जगासमोर आणले गेले.
1976 साली प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित मराठी लेखक, कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचे निधन.
वि. स. खांडेकर हे मराठी कादंबरीकार, लेखक होते. वि.स. खांडेकर यांचा जन्म सांगलीत झाला. त्यांच्या कार्यकाळात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना आणि समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. 'ययाति' या कादंबरीसाठी त्यांना 1960 साली साहित्य अकादमी पुरस्काराने तर,1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :