CWG 2022, Vijay Kumar : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने आज एकाच दिवसात ज्युदो खेळात दोन पदकं मिळवली आहेत. आतापर्यंत केवळ वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय खेळाडू पदक जिंकत होते, पण आज ज्युदोमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. सुशीला देवीने रौप्य पदक जिंकताच विजय कुमार (Vijay Kumar) याने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं आहे. विजयला सायप्रसच्या पेट्रोस क्रिस्टोडौलाइड्सने मात दिल्यामुळे कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. विजयच्या या कामगिरीनंतर संपूर्ण देशातून त्याच कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.






भारताची पदकसंख्या आठवर


सुशीला देवीने ज्युदोमध्ये रौप्य मिळवलं असून विजयकुमारनेही कांस्य पदक मिळवलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 8 वर गेली आहे. याआधी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं आहे. याशिवाय लॉन बाऊल्समध्येही भारतीय महिलांचा ग्रुपम फायनलमध्ये पोहोचल्याने किमान रौप्यपगक भारताने निश्चित केलं आहे. या पदकासह भारताच्या खात्यावर नऊ पदकं झाली असून हे नववं पदक सुवर्ण असेल की रौप्य हे पाहावं लागेल. 



हे देखील वाचा- 



Commonwealth Games 2022 : अमित पाठोपाठ मोहम्मद हुसामुद्दीनही उपांत्यपूर्व फेरीत, बांग्लादेशच्या बॉक्सरला मात देत मिळवला प्रवेश


CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेतील पदकतालिकेत भारताची मोठी झेप; तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंचं दमदार प्रदर्शन