29th May 2022 Important Events : मे महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 29 मे चे दिनविशेष.
1905 : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका होत्या. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील मिरज येथे झाला. त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. मराठी नाट्यपरिषदेने बालगंधर्व सुवर्णपदक देऊन त्यांचा सन्मान केला (1966). त्यांना भारत सरकारने पद्मभूषण किताबाने गौरविले (१९७०). त्या विष्णुदास भावे सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या (1974). कोलकात्याच्या आय. टी. सी. संगीत रिसर्च अकादमीने त्यांचा सन्मान केला.
1972 : हिंदी चित्रपटअभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे निधन.
पृथ्वीराज कपूर हे हिंदी सिनेमा आणि भारतीय रंगमंच यांचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. पृथ्वीराज यांनी मूकपटात आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. भारतीय जन नाट्य संघ (Indian People's Theatre Association-IPTA-) याच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. पृथ्वीराज यांनी 1944 मध्ये मुंबईत पृथ्वी थिएटरची स्थापना केली. ह्या नाटक कंपनीची नाटके संपूर्ण देशभरात होत होती. त्यांनी भारतातील पहिला श्राव्य चित्रपट 'आलम आरा' मध्ये एक प्रमुख भूमिका बजावली. पृथ्वीराज कपूर यांना 1969 साली कला क्षेत्रात पद्मभूषण देऊन भारत सरकारने सन्मानित केले होते. 1972 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला.
सन 1906 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार, लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक कन्हैयालाल प्रभाकर मिश्रा यांचा जन्मदिन.
सन 1919 साली विश्वविख्यात जर्मन भौतिकशास्त्रज्ञ सर अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सामान्य सापेक्ष सिद्धांताची चाचणी केली.
सन 2008 साली भारतीय जनता पक्षाचे नेता वी. एस. येदुरप्पा यांनी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
सन 1987 साली स्वातंत्र्य भारताचे पाचवे पंतप्रधान व भारतीय शेतकरी नेता चौधरी चरण सिंह यांचे निधन.
महत्वाच्या बातम्या :