27th June 2022 Important Events : 27 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
27th June 2022 Important Events : जून महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
27th June 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 27 जूनचे दिनविशेष.
1880 : साली प्रसिद्ध अमेरिकन लेखिका, राजकीय कार्यकर्त्या हेलन केलर (Helen Keller) यांचा जन्मदिन.
हेलन केलर या अमेरिकन लेखिका, राजकीय कार्यकर्त्या आणि व्याख्यात्या होत्या त्यांचा जन्म 27 जून 1880 रोजी झाला त्या पहिल्या अंध आणि बहिऱ्या व्यक्ती होत्या ज्यांना पदवी प्राप्त झाली. सुरुवातीला त्यांना फार त्रास झाला पण त्यांना कळले की, आपल्या स्पर्श संवेदना तीव्र आणि आहेत.
1954 : पहिले विद्युत केंद्र मॉस्कोजवळ ओबनिन्स्क येथे सुरू झाले.
सन 1954 साली अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिल्या 5000 किलोवॅट क्षमता असणाऱ्या विद्युतकेंद्राची स्थापना रशियाची राजधानी मॉस्को जवळील ओबनिन्स्क येथे करण्यात आली.
1964 : साली पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट सेवानिवृत्त भारतीय धावपटू पी. टी. उषा यांचा जन्मदिन.
या एक निवृत्त भारतीय ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहेत. त्यांचा जन्म केरळमधील कुट्टाली, कोझिकोड येथे झाला. १९७९ पासून त्या भारतीय ऍथलेटिक्सशी संबंधित आहेत. त्यांना अने,कदा "भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी" म्हटले जाते.
1838 : बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म.
1964 : साली दिल्ली येथील तीन मूर्तिच्या भवनामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.
2008 : साली मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
2015 : साली संयुक्त राष्ट्र संघाने भारतीय चित्रपटाच्या इतिहासात विशेष स्थान असणार्या सत्यजित रे यांचे चित्र प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.
1839 : साली भारतीय इतिहासाच्या कालखंडातील प्रसिद्ध शिख साम्राज्याचे संस्थापक शिख धर्मीय महाराजा रणजीत सिंह यांचे निधन.
महत्वाच्या बातम्या :