24th June 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 24 जूनचे दिनविशेष.


24 जून : योगिनी एकादशी (Yogini Ekadashi)


ज्येष्ठ महिन्यातील वद्य त्रयोदशी योगिनी एकादशी नावाने साजरी केली जाते. यावर्षी 24 जून 2022 रोजी योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. योगिनी एकादशीचे व्रत आचरल्याने सर्व प्रकारच्या पापांतून मानवाला मुक्ती मिळते, असे सांगितले जाते. भगवान श्रीकृष्णाने या व्रताचे महत्त्व विषद केले आहे. योगिनी एकादशीचे व्रताचे आचरण केल्यास 88 हजार ब्राह्मणांना भोजन घातल्याचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.


1937 : इंग्रजी भाषेतील कादंबरीकार अनिता देसाई यांचा जन्म. 


अनिता देसाई पद्मश्री (साहित्य आणि शिक्षण 2014) अनिता देसाई या इंग्रजी भाषेतील भारतीय कादंबरीकार आहेत. या मुलांच्या पुस्तकांच्या लेखिका आहेत ज्यांनी हवामानशास्त्रापासून वनस्पतिशास्त्रापर्यंतच्या दृश्य प्रतिमांद्वारे चरित्र आणि मूड तयार करण्याची उत्कृष्ट कामगिरी केली आहे.


1998 : अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण पुरस्कार’ जाहीर


1899 : मर्दानी रुप, तिन्ही सप्तकांतुन सहजपणे फिरणारा आवाज या देणग्या लाभलेले आणि गंधर्वयुगाची स्मृती जागवणारे नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक यांचा जन्म.


2001 : आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकी करणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.


महत्वाच्या बातम्या :