Pakistan Cricket News : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आंतरशहर चॅम्पियनशिपसाठी संघात निवड न झाल्याने खेळाडूने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शोएब असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या क्रिकेटपटूचे नाव आहे. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पाकिस्तानमधील दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबाद येथील शोएब या क्रिकेटपटूने आत्महत्येचा प्रयत्नच्या वृत्ताला पाकिस्तानमधील माध्यमांनी दुजोरा दिला आहे. पाकिस्तानचा देशांतर्गत वेगवान गोलंदाज शोएबने आपले मनगट कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही बाब त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
शोएबच्या कुटुंबातील एका सदस्याने माध्यमांना दिलेल्या माहितनुसार, चॅम्पियनशिपच्या चाचण्यांनंतर प्रशिक्षकाने शोएबची संघात निवड केली नाही. त्यामुळे तो नैराश्यात गेला होता. नैराश्यातून त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. आम्हाला तो त्याच्या खोलीच्या बाथरूममध्ये बेशेद्ध अवस्थेत आढळून आला. यावेळी त्याने स्वत:चे मनगट कापून घेतलेले दिसले. त्यामुळे त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.
शोएब बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडला होता. आम्ही त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानातील एका खासगी रूग्णालयाच शोएब यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, संघात जागा न दिल्याने एवढे टोकाचे पाऊल उचलण्याची पाकिस्तान क्रेकेटमधील ही दुसरी घटना आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये कराचीचा अंडर-19 क्रिकेटपटू मोहम्मद जरयाब याने शहरातील अंडर-19 संघातून वगळल्यानंतर त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता शोएबने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या