15th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. आज 15 जुलै. जवळपास 96 वर्षांपूर्वी 1926 रोजी याच दिवशी मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 15 जुलैचे दिनविशेष.


1926 : मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली.


1955 : पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर


1542 : लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन. (जन्म: १५ जून १४७९)


1919 : एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी 1902 मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. 


1916 : साली जगभरात विमान, रोटरक्राफ्ट, रॉकेट, उपग्रह, दूरसंचार उपकरणे आणि क्षेपणास्त्रांची रचना आणि विक्री करणारी अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी बोईंग ची स्थापना करण्यात आली.


1967 : साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी गायक व रंगमंच अभिनेता बाल गंधर्व यांचे निधन.


1997 : साली महाराष्ट्रीयन पर्यावरणवादी कार्यकर्ता महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.


2011 : साली भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने आपल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पीएसएलव्हीद्वारे आधुनिक संप्रेषण उपग्रह जीसॅट-12 अंतराळ कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केला.


महत्वाच्या बातम्या :