14th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. आज 14 जुलै थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 14 जुलैचे दिनविशेष.

1856 : थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म. 

गोपाळ गणेश आगरकर हे लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि ’केसरी’चे पहिले संपादक होते. डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक आणि फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत आणि शिक्षणतज्ञ होते. 

1920 : केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म.

महाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री. शेतकरी कुटुंबात पैठण येथे जन्म. पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंट्यात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांद्वारा त्यांनी मराठवाड्याचा विकास घडवून आणला. जायकवाडी प्रकल्प हा शंकररावजींच्याच प्रयत्नाचे मोठे फळ आहे.

1789 साली पॅरिस मधील नागरिकांनी फ्रेंच शासकांकडून होत असलेल्या अन्याया विरुद्ध फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे प्रतिक असलेल्या बॅलेस्टाईलच्या तुरुंगावर हल्ला केला. या घटनेपासून फ्रेंच राज्यक्रांतीला सुरुवात झाली.

सन 2003 साली जागतिक बुद्धिबळ महासंघा द्वारे भारतीय बुद्धिबळ खेळाडू संदीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या :