13th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. आज 13 जुलै दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. महाभारत, पुराणे लिहिलेल्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा दिवस. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 13 जुलैचे दिनविशेष.


13 जुलै : गुरुपौर्णिमा


दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. महाभारत, पुराणे लिहिलेल्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा दिवस. या वर्षी बुधवार, 13 जुलै 2022 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी गुरुंचे पूजन केले जाते. वेद व्यासांच्या जन्मामुळे हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी व्यास जयंतीही साजरी केली जाते. 


साईबाबा उत्सव - शिर्डी 


साईबाबा हे एक भारतीय फ़कीर होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा आणि सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. 12 ते 14 जुलै दरम्यान शिर्डीत भव्य साईबाबा उत्सव साजरा केला जाणार आहे. 


2009 : साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळूभाऊ फुले यांचे निधन.


मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते. मूळ नाव निळकंठ कृष्णाजी फुले. ‘निळूभाऊʼ या नावाने सुपरिचित होते. सलग 40 वर्षे ते चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर सक्रिय होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 140 हून अधिक मराठी चित्रपटांमधून आणि 12 हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांच्या भूमिकांपैकी सामना, सिंहासन, शापित, पुढचं पाऊल यांतील भूमिका विशेष लक्षणीय मानल्या जातात.


1837 : राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेसमध्ये (Buckingham Palace) राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.


1660 : साली मराठा योद्धा बाजी प्रभु देशपांडे आणि आदिलशाह सल्तनतचे सेनापती सिद्दी मसूद यांच्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर  शहरालगत असलेल्या विशालगडच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराच्या कडेला पावनखिंडची लढाई झाली.


2000 : साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी कवी इंदिरा संत यांचे निधन.


इंदिरा संत या प्रसिद्घ मराठी भावकवयित्री होत्या. भूतकाळाच्या जाणिवेला सतत वर्तमानकाळात आविष्कृत करणे, हे त्यांच्या कवितेचे खास वैशिष्ट्ये होते. इंदिराबाईंना अनेक मानसन्मान लाभले. शेला,मेंदी आणि रंगबावरी  या काव्यसंगहांना राज्य शासनाचे वाङ्‌मयीन पुरस्कार लाभले. तसेच, गर्भरेशमी  या काव्यसंगहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.


महत्वाच्या बातम्या :