Ananya : 'अनन्या' (Ananya) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रताप फड (Pratap Fad) दिग्दर्शित या सिनेमातील 'तू धगधगती आग' (Tu Dhagdhagti Aag) हे स्फूर्तीदायी गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या जबरदस्त गाण्याला बॉलिवूडचे सुपरहिट गायक विशाल ददलानी यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. अभिषेक खणकरचे बोल असलेले हे गाणं समीर साप्तीस्करने संगीतबद्ध केलं आहे.
ऊर्जेने भरलेले 'तू धगधगती आग'
आयुष्यातील एका कठीण प्रसंगावर मात करत 'अनन्या' जिद्दीने आणि खंबीरपणे लढत असल्याचे या गाण्यात दिसत आहे. 'शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे' या टॅगलाईनचा अर्थ या गाण्यात स्पष्ट होत असून प्रचंड ऊर्जेने भरलेले हे गाणे आहे.
'अनन्या' सिनेमाचे दिग्दर्शक प्रताप फड या गाण्याबद्दल म्हणाले, 'तू धगधगती आग' या गाण्याची खासियत म्हणजे ज्यांनी बॅालिवूडला एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली अशा विशाल ददलानी यांनी हे गाणं गायलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं विशाल यांनी गाताना खूपच एन्जॉय केलं आहे. त्यामुळे त्यांचातील या सकारात्मक लहरी यात गाण्यात आपसूकच आल्या आहेत. हे गाणं अधिकच बळ देणारे बनले."
निर्माता रवी जाधव म्हणाले," तू धगधगती आग' हे गाणं अतिशय प्रेरणा देणारे असून या गाण्याची संगीत टीम अतिशय तगडी आहे. विशाल ददलानी यांनी आपल्या आवाजाने या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. यातील प्रत्येक गाणं काहीतरी सांगत आहे. त्यामुळे ही गाणी श्रोत्यांना अधिक भावतील.''
22 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित
'अनन्या' हा सिनेमा 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स यांनी केली आहे. या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन प्रताप फड यांनी केलं आहे. ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
संबंधित बातम्या